सीसीआयकडून शहाद्यात कापूस खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:31 IST2020-02-11T13:31:18+5:302020-02-11T13:31:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी केंद्रात सीसीआयकडून सोमवारपासून कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी ...

CCI starts buying cotton in martyrdom | सीसीआयकडून शहाद्यात कापूस खरेदी सुरू

सीसीआयकडून शहाद्यात कापूस खरेदी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी केंद्रात सीसीआयकडून सोमवारपासून कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कापूस आता विक्रीसाठी काढल्याने बाजार समितीच्या शेडमध्ये कापूस विक्रीसाठी आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
शहादा तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गेल्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कूपनलिका आटल्याने बहुतांश शेतकºयांनी जिरायती कापूस लागवडीवर भर दिला होता. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये सीसीआयकडून होणारी कापूस निर्यात थांबली असल्याचे समजते. शिवाय साठा करण्यासाठी जागा नसल्याने कापूस खरेदी थांबवण्यात आली होती. कापूस खरेदी बंद झाल्याने शेतकºयांचे हाल सुरू झाले होते. यंदा कापसाचा हंगाम लांबल्याने बहुतांश ठिकाणी अद्यापही कापसाची वेचणी सुरू आहे. मध्यंतरी सीसीआयने कापसाची खरेदी बंद केल्याने अर्थकारण बिघडू नये म्हणून बहुतांश शेतकºयांनी खेडा खरेदीला प्राधान्य देत घरबसल्या कापूस विक्री केली होती. निर्माण झालेल्या या स्थितीवर तोडगा काढून कापूस खरेदी करण्याचे आदेश केंद्रांना दिले होते. त्यानुसार सोमवारी शहादा केंद्रात सकाळी कापूस खरेदी सुरू करण्यात आली.
२५० वाहने दाखल
सीसीआयने कापूस खरेदी पुन्हा सुरू केल्याचे कळताच शेतकºयांनी आपला कापूस विक्रीसाठी आणला आहे. बाजार समितीच्या आवारात सुमारे २५० वाहने दाखल झाली आहेत. त्यातील १९० वाहनांमधील कापसाची सोमवारी मोजणी झाली. प्रतिक्विंटल पाच हजार २३२ ते पाच हजार ४५० या दरम्यान कापसाला भाव देण्यात येत असल्याने बहुतांश शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. सीसीआय शेतकºयांना कापूस खरेदी केल्यानंतर किमान आठ दिवसात पेमेंट करते. त्यामुळे लहान शेतकºयांनी मात्र आपला कापूस रोख रक्कम देणाºया जिनिंग तसेच खेडा खरेदी करणाºया व्यापाºयांना देणे पसंत केले आहे. शहादा येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात आतापर्यंत एक लाख २५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. आता त्यात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: CCI starts buying cotton in martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.