शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

आरोग्य संपन्नतेसाठी घाटी लेझीम उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:07 IST

गणेशोत्सवाचा उत्साह : राणी लक्ष्मीबाई लेझीम पथक व पोलीस वसाहत महिला मंडळाचा उपक्रम

नंदुरबार : सध्या गणेशोत्सवात कुठे गुलालाची उधळण तर कुठे कर्णकश्श डीजेचा आवाज ऐकावयास येत आह़े परंतु यंदाच्या गणेशोत्सवात विशेष घाटी लेझीम नृत्याची ओळख अनेकांना होताना दिसून येत आह़े जिल्ह्यात गेल्या 40 वर्षापासून लोप पावत असलेल्या या नृत्य प्रकाराला पुन्हा नवसंजीवणी देण्याचे काम अॅड़ उमा चौधरी व त्यांच्या सहका:यांकडून करण्यात येत आह़ेशरीराचे अंग-अंग मोकळे करणारा या घाटी लेझीम नृत्य  प्रकारा जिल्ह्यात साधारणत 40 वर्षापूर्वी अस्तित्वात होता़ गणेशोत्सवासह विविध सण-उत्सवांमध्ये घाटी लेझीम नृत्य केले जात अस़े या नृत्य प्रकारामुळे अनेक प्रेक्षक तासन्तास खिळून बसत असल्याच्या आठवणी या लेझीम नृत्याच्या साक्षीदार कमला त्र्यंबक गवळी या सांगतात़ सुरुवातीला जिल्ह्यात कमलाबाई व त्यांच्या सहकारी यांनी घाटी लेझीम नृत्य प्रकाराला सुरुवात केली़ पुर्वीच्या अनेक सणावळींमध्ये हा नृत्य प्रकार आवजरुन सादर करण्यात यायचा परंतु त्यानंतर आधुनिक वाजंत्री, डिजे आदींच्या भाऊ गर्दीत पारंपारिक नृत्य प्रकार जवळपास लोपच पावले आहेत़ परंतु घाटी लेझीम नृत्य प्रकारात होणारी शारीरिक कसरत व त्यातून  मिळणारे आरोग्याचे फायदे हेरत अॅड़ उमा चौधरी यांनी या लोप पावलेल्या नृत्य प्रकाराला पुन्हा नवसंजीवणी मिळावी म्हणून जिल्ह्यात चळवळ उभी केली आह़े अॅड़ चौधरी व त्यांच्या प्रशिक्षीत सहकारी महिलांकडून युवती व महिलांना घाटी लेझीम नृत्य प्रकाराचे विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येत आह़े यंदाच्या गणेशोत्सवापासून घाटी लेझीम नृत्य प्रकाराची सुरुवात करण्यात येत आह़े बुधवारी मानाच्या दादा गणपतीला घाटी लेझीम नृत्याने मानवंदना देण्यात आली तर गुरुवारी बाबा गणपतीला या नृत्य प्रकाराने मानवंदना देण्यात आली आह़े या वेळी साधारणत 200 युवती व महिलांनी शास्त्रशुध्द पध्दतीने घाटी लेझीम नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली होती़ दरम्यान, अॅड़ उमा चौधरी यांनी सांगितल्यानुसार घाटी लेझीमचे प्रशिक्षण युवती व महिलांना मोफत देण्यात येत आह़े या लेझीम प्रकारामुळे शरीरातील सर्व अवयवांचा वापर होत असल्याने व्यायामाच्या दृष्टीनेही यास महत्व आह़े साधारणात एक महिने इतका कालावधी या नृत्य प्रकारासाठी लागत आह़े लोप पावत असलेल्या या लोककलेचा प्रसार व प्रचार संपूर्ण जिल्ह्यात व्हावा यासाठी अॅड़ उमा चौधरी यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़े सदर लेझीम प्रकार हा सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रसिध्द आह़े त्याच प्रमाणे जळगावातील रावेर येथेसुध्दा विविध सण-उत्सवांमध्ये घाटी लेझीम प्रकार दिसून येत असल्याची माहिती जाणकारांकडून देण्यात आली आह़े या लेझीम प्रकाराला पुन्हा नवसंजीवणी मिळण्याची गरज आह़ेअघाटी नृत्य प्रकार शास्त्रशुध्द पध्दतीने केल्यास तो आरोग्यासाठी फायदेशिर ठरु शकतो़ या लेझीम प्रकारामुळे महिलांना विशेष फायदे होत असतात़ आधुनिक जीवनात व्यायामाचा अभाव जाणवत असतो़ त्यामुळे साहजिकच विविध आजारही संभवत आहेत़ जिल्ह्यात सर्वप्रथम रामदास व्यायाम शाळेकडून घाटी लेङिामला सुरुवात करण्यात आली होती़ परंतु कालांतराने हा प्रकार बंद झाला़ लेङिाम, हलगीचा वापर करुन मयुर चाल, पवित्रा चाल या पध्दतीने घाटी लेङिामव्दारे सलामी देण्यात येत असत़े याचे एकूण 70 प्रकारांपैकी 10 लेङिाम प्रकार शिकवण्यात येतात़