Carrying a carrier's box from a Nandurbar depot | नंदुरबार आगारातून वाहकाची पेटीच नेली चोरून

नंदुरबार आगारातून वाहकाची पेटीच नेली चोरून

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एस.टी.बस वाहकाची पेटी व त्यातील सहा हजार रुपये किंमतीची तिकीटे चोरट्याने लंपास केल्याची घटना नंदुरबार एस.टी.आगारात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार एस.टी.आगारात कार्यरत ज्योत्सना सर्जेराव सोनवणे, रा.तिरुपतीनगर, नंदुरबार यांनी नेहमीप्रमाणे आपली वाहकाची पेटी आगारातील दालनात ठेवली होती. पेटीत आवश्यक साहित्य व सहा हजार ७० रुपये किंमतीचे तिकिटे होती. चोरट्यांनी १७ रोजी मध्यरात्री पेटीच चोरून नेली. सकाळी शोधाशोध केल्यावर पेटी सापडली नाही. त्यामुळे वाहक ज्योत्सना सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील आगारात अशा प्रकारे चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याप्रमाणे इतर ठिकाणीही अशा प्रकारचे कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.

Web Title: Carrying a carrier's box from a Nandurbar depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.