मालवाहू वाहनाची रिक्षाला धडक, पाचजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 13:05 IST2017-10-06T13:05:27+5:302017-10-06T13:05:27+5:30

Cargo vehicle rickshaw hit and five injured | मालवाहू वाहनाची रिक्षाला धडक, पाचजण जखमी

मालवाहू वाहनाची रिक्षाला धडक, पाचजण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव मालवाहू गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या  रिक्षाला धडक दिल्याने पाचजण जखमी झाल्याची घटना जामतलाव, ता.नवापूर येथे 4 रोजी सायंकाळी घडली. 
नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर पिंपळनेरकडे जाणा:या भरधाव पीकअप वाहनाने (क्रमांक एमएच 41 एजी 2272) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला (क्रमांक एमएच 39-जे 5539) जबर धडक दिली. त्यात बसलेले जयेश काशिनाथ कोकणी (15), रोहित सोमा कोकणी (15) तेजस विक्रम गावीत, विनाबाई रमेश गावीत व मगन डुटा गावीत रा.जामतलाव व रायपूर हे जखमी झाले. त्यांना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात रिक्षाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मगन डुटा गावीत यांनी फिर्याद दिल्याने पीकअप वाहनचालकाविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Cargo vehicle rickshaw hit and five injured