तीन शिफ्टमध्ये घेतली जाते काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:42 IST2020-05-07T12:42:13+5:302020-05-07T12:42:41+5:30
भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी क्वारंटाईन कक्षांची निर्मिती करण्याचा निर्णय झाल्यानंतर ...

तीन शिफ्टमध्ये घेतली जाते काळजी
भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी क्वारंटाईन कक्षांची निर्मिती करण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्वात प्रथम नंदुरबारात होळ तर्फे हवेली शिवारातील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेची निवड करण्यात आली होती़ येथे ५० खाटांची सर्वात प्रथम सोय होती़ यात वाढ करुन शहरालगतच तीन आणखी कक्ष निर्माण करुन आतापर्यंत १९० जणांवर उपचार झाले आहेत़
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ जे़एच़तडवी यांच्या मार्गदर्शनात होळ तर्फे हवेली, पॉलिटेक्निक कॉलेज आणि पटेलवाडी भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात तीन कक्षांची निर्मिती करण्यात आली होती़ एकूण १८० खाटांची सोय याठिकाणी करण्यात आली आहे़ कक्षात आतापर्यंत १९० जणांना आणले गेले होते़ यातील १०८ जण सुखरुप घरी गेले आहेत़ तर ८२ जणांवर येथे उपचार सुरु आहेत़ उपचारांपेक्षा त्यांच्यावर केवळ लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे़ यातील बहुतांश जण हे बाहेरगावाहून याठिकाणी आले आहेत़ त्यांना सोशल डिस्टन्सिंगद्वारे अन्नपुरवठा, पाणी देणे तसेच पीपीई कीट परिधान करुन वैद्यकीय अधिकारी माहिती देत आहेत़ २४ तास कक्षात राहणे शक्य नसल्याने मानसिक समस्या येण्याची अडचण लक्षात घेत सर्वांना वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत़ अडचण किंवा शंका असल्यास फोन करुन माहितीचे आदान-प्रदान करण्यावर भर दिला जात आहे़ यातून येथे असलेल्या ८२ जणांना बराच मोठा दिलासा मिळाला आहे़ भेटणारे किंवा बाहेरुन कोणासह परवानगी नसल्याची माहिती देण्यात आली आहे़
दरम्यान आरोग्य विभागाने विमल विहार या भागात आणखी ३० बेडची क्षमता असलेला कक्ष सुरु केला आहे़ याठिकाणीही क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना आणून ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ चार कक्षांसाठी तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी एक मेडीकल आॅफिसर, एक आरोग्य सेविका व एक एमपीडब्ल्यू यांची नियुक्ती आहे़ आठ तासांच्या सेवेत हे पथक प्रत्येक क्वारंटाईन केलेल्याची भेट घेत त्यांच्यासोबत संवाद साधतात़
संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने लहान शहादे आणि ढेकवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची मदत घेतली आहे़ हे अधिकारी इंचार्ज म्हणून केंद्रांवर नियुक्त करण्यात आले आहेत़
तीन कक्षांसाठी विविध विभागाचे कर्मचारी नियुक्त
४नंदुरबार शहरातील तीन क्वारंटाईन कक्षांमध्ये महसूल, आरोग्य, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि आदिवासी विकास विभाग यांचे ३१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ हे कर्मचारी सकाळी ९ वाजेपासून येथे हजर होतात़
४जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाईन कक्षांच्या खर्चासाठी ८० लाख रुपयांचा निधी वितरीत केला होता़ यातून सर्व कक्षांमध्ये पंखे, बेड यासह विविध साहित्याची खरेदी करुन ते येथे दाखल असलेल्यांना देण्यात येत आहे़
४बाह्य जगासोबत संपर्क तुटला असला तरी कुटूंबासोबत संपर्क ठेवण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो़ यातून मानसिक आधार मिळत असल्याचे सांगण्यात आले़
४क्वारंटाईन कक्ष सुरु असलेल्या सर्व इमारती ह्या प्रामुख्याने शासकीय वसतीगृहे आहेत़ त्यामुळे त्यांचे परत हस्तांतरण करण्यापूर्वी किमान चारवेळा निर्जंतुकीकरण होणार आहे़ चारही ठिकाणी दिवसातून एकवेळा संपूर्ण खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला जात आहे़