रायंगण फाटय़ाजवळ ट्रकच्या धडकेत कार चक्काचूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 13:21 IST2018-04-24T13:21:15+5:302018-04-24T13:21:15+5:30
तीन जण जखमी : जिल्हा रुग्णालयात उपचार

रायंगण फाटय़ाजवळ ट्रकच्या धडकेत कार चक्काचूर
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 24 : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रायंगण गावाच्या फाटय़ाजवळ एका कारला ट्रकने मागून धडक दिल्याने कारचा चक्काचूर होऊन एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
पोलीस सूत्रानुसार, कार (क्रमांक जी.जे.05 जेई 9452) सुरतकडे जात असताना रायंगण फाटय़ाजवळ मागून ट्रकने (क्रमांक एम.एच.18 जीबी 1876) भरधाव वेगात ठोस दिली. या अपघातात सुनील अजरुन सूर्यवंशी (20), लताबाई शशिकांत निकुम (54) व शशिकांत निकुम (53) हे जखमी झाले. अपघाताची खबर मिळताच 108 रुग्णवाहिकेवरील डॉ.राहुल सोनवणे व चालक लाजरस गावीत यांनी घटनास्थळी येऊन जखमी झालेल्या व्यक्तींना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण चौरे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात 108 च्या मदतीने दाखल करण्यात आले आहे.