क्षमता २०० रुग्णांची उपचार मात्र २५० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:29 AM2021-04-15T04:29:22+5:302021-04-15T04:29:22+5:30

नंदुरबार जिल्ह्यात आधीच आरोग्य सुविधांची वानवा आहे. खाजगी मोठे रुग्णालय नसल्याने सर्वाधिक भार जिल्हा रुग्णालयावरच आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनची ...

Capacity of treatment of 200 patients but only 250 | क्षमता २०० रुग्णांची उपचार मात्र २५० वर

क्षमता २०० रुग्णांची उपचार मात्र २५० वर

Next

नंदुरबार जिल्ह्यात आधीच आरोग्य सुविधांची वानवा आहे. खाजगी मोठे रुग्णालय नसल्याने सर्वाधिक भार जिल्हा रुग्णालयावरच आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असलेले २०० बेडचा कक्ष उभारण्यात आला आहे. याठिकाणी गेल्या महिनाभरापासून दीडशेपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. गेल्या १५ दिवसापासून रोज ८०० ते १००० नवीन रुग्ण सापडत असल्याने त्यात गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवले जात आहे तर मध्यम लक्षण असणाऱ्या रुग्णांना एकलव्य कोविड सेंटरमध्ये उपचार दिले जात आहेत. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा रुग्णांवर महिला रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या २०० बेडच्या कक्षात उपचार सुरू आहेत. याठिकाणी जवळपास १२५ बेडवर व्हाॅल्वद्वारे ऑक्सिजन पुरवठा होतो तर इतरांना सिलिंडर लावून ऑक्सिजन दिले जाते. सध्या मात्र ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. खाजगी रुग्णालयातदेखील जागा नसल्याने जिल्हा रुग्णालयात जे रुग्ण आले त्यांना उपचारासाठी दाखल करुन घेतले जाते आहे. बुधवारचे चित्र पाहिल्यास याठिकाणी जवळपास २५० रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. कक्षात २०० बेड असल्याने उर्वरित ५० रुग्णांना रुग्णालयातील मोकळ्या जागेत गाद्या टाकून तेथेच सिलिंडर लावून ऑक्सिजन दिला जात आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे.

रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असल्याने रुग्णांना दाखल करुन घ्यावे लागत आहे. त्यासाठी जे शक्य ते करण्याचा प्रयत्न आहे. जमिनीवर गाद्या टाकून ऑक्सिजन दिला जात आहे. अनेक रुग्ण बरे होत आहेत. रुग्णालयात आलेल्या रुग्णांना उपचार देणे आवश्यक आहे.

-डाॅ.के.डी. सातपुते, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Capacity of treatment of 200 patients but only 250

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.