व्ही.सी.द्वारे पडताळणीनंतर कर्करोगावर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:18 IST2020-02-09T12:18:01+5:302020-02-09T12:18:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गंभीर स्वरुपाच्या मुख कर्करोगांवर उपचारासाठी मुंबई व औरंगाबाद येथील नामांकित रुग्णलयांमार्फत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ...

Cancer treatment after screening by VC | व्ही.सी.द्वारे पडताळणीनंतर कर्करोगावर उपचार

व्ही.सी.द्वारे पडताळणीनंतर कर्करोगावर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गंभीर स्वरुपाच्या मुख कर्करोगांवर उपचारासाठी मुंबई व औरंगाबाद येथील नामांकित रुग्णलयांमार्फत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात व्हीडीओद्वेरे संवाद साधला जात आहे. आवश्यतेनुसार या रुग्णांना संदर्भ सेवा दिली जात असून तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहे.
मुख कर्करोगामुळे जागतिक स्तरावर आठ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. मृतांमध्ये भारतीयांचे प्रमाण ८० टक्के असल्याने या रोगासाठी भारत राजधानीच ठरतो. तसे नंदुरबार जिल्ह्यातही या आजाराची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. कर्करोगाच्या लक्षणांमध्ये सुरवातीला तोंडात पांढरे चट्टे आढळतात. त्याशिवाय लाल चट्टेही आढळून येतात, लाल चट्टा १५ दिवसांपेक्षा अधिक राहिल्यास रुग्णाचे तोंड न उघडण्याची मोठी समस्या निर्माण होते. नंदुरबार जिल्ह्यात तोंड न उघडणाºया मुख कर्करुग्णांमध्ये केवळ पुरूषच नव्हे तर महिलांचाही समावेश आहे.
या आजाराचे प्रामुख्याने तीन टप्पे केले जातात, रुग्णाला वाचविण्यासाठी त्याच्यावर पहिल्या व दुसºया टप्प्यातच उपचार होणे आवश्यक आहे. दुसरा टप्पा ओलांडणारा रुग्ण दगावण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल होणºया मुख कर्करुग्णांमधील आजाराची प्रथम मुंबई येथील केईएम, टाटा कॅन्सर हॉस्पिटल व औरंगाबाद येथील शासकीय कॅन्सर हास्पिटलच्या तज्ञ डॅक्टरांमार्फत व्हीडीओद्वारे पडताळणी करण्यात येते, त्यानुसार आजाराचे गांभीर्य लक्षात घेत रुग्णांना या तिन्ही रुग्णालयांमध्ये उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. त्यातून गंभीर स्वरुपाच्या रुग्णांवर मुंबई येथील केईएम, टाटा कॅन्सर हास्पिटल व औरंगाबाद येथील शासकीय कॅन्सर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात येत आहे. नुकतेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमध्ये तळोदा तालुक्यातील रोझवा, कालीबेल व धडगाव येथील एक अशा तिघांचा समावेश आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Cancer treatment after screening by VC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.