खावटीसाठी रात्रीच्या ड्युट्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST2021-04-20T04:31:56+5:302021-04-20T04:31:56+5:30

खावटी अनुदान योजनेच्या कामाला तळोदा प्रकल्प कार्यालयाकडून गती देण्यात आली आहे. लाभार्थ्यांचे जातीचे दाखले व इतर कागदपत्र अपलोड करून ...

Cancel night duty for khawati | खावटीसाठी रात्रीच्या ड्युट्या रद्द

खावटीसाठी रात्रीच्या ड्युट्या रद्द

खावटी अनुदान योजनेच्या कामाला तळोदा प्रकल्प कार्यालयाकडून गती देण्यात आली आहे. लाभार्थ्यांचे जातीचे दाखले व इतर कागदपत्र अपलोड करून फॉर्म अपलोड करणे व त्यांची पडताळणी केली जात आहे व आयुक्त लेवल पाठवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी तळोदा प्रकल्प कार्यालयाकडून कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये ड्युटी लावण्यात आल्या होत्या. कामासाठी गैरहजर राहण्याऱ्या कर्मचाऱ्यांवर वेतन कपात याची कारवाई करायला आली होती. पण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती करण्यात आलेली आहे. ही एकंदरीत परिस्थिती पाहता प्रकल्प अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रकल्प लॉगीनला रात्रपाळीचे, इतर पाळी कामकाज करणाऱ्या शिक्षकांचे आदेश रद्द करण्यात आला असून,यापुढे शालेय कर्मचाऱ्यांनी स्वतःचे व शाळेचे डीईओ लॉगिनचे परिपूर्ण कामकाज करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Cancel night duty for khawati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.