शहादा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीत दुरंगी व तिरंगी लढतींसाठी प्रचार जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 11:56 IST2021-01-09T11:56:09+5:302021-01-09T11:56:50+5:30

ईश्वर पाटील लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुक्यात २७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम डिसेंबर २०२० पासून सुरु झाला होता. यांतर्गत ...

Campaign for two-way and three-way fights in 21 gram panchayats in Shahada taluka | शहादा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीत दुरंगी व तिरंगी लढतींसाठी प्रचार जोरात

शहादा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीत दुरंगी व तिरंगी लढतींसाठी प्रचार जोरात

ईश्वर पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :  तालुक्यात २७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम डिसेंबर २०२० पासून सुरु झाला होता. यांतर्गत झालेल्या माघारीपर्यंतच्या प्रक्रियेत एकूण २०० जणांनी माघार घेतली होती. परिणामी ४४९ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात असून २१ ग्रामपंचायतीत रंगलेल्या या लढती पॅनलनिहाय दुरंगी आणि तिरंगी होत असल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. 
          निवडणूक कार्यक्रम सुरु झाल्यानंतर माघारीपर्यंतच्या मुदतीत दोंदवाडे,  नांदरखेडा, वर्ढे तर्फे शहादा, बामखेडा तर्फे सारंगखेडा, बामखेडा तर्फे त-हाडी, हिंगणी आणि न्यू असलोद या सहा ग्रामपंचायती बिनविरोध तर नागझिरी ग्रामपंचायतीत पाच जागा बिनविरोध झाल्याने केवळ २१ ग्रामपंचायतीत निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रचार ऐन भरात आहे. सोशल मिडिया आणि प्रत्यक्ष प्रचार फे-या यातून निवडणूक फिव्हर पूर्णपणे चढल्याचे दिसून आले आहे. आजघडीस तालुक्यातील कुकावल ग्रामपंचायतीत १८ उमेदवार रिंगणात आहेत.  कोठली तर्फे सारंगखेडा येथे १९, कु-हावद तर्फे सारंगखेडा येथे १३,  कवठळ तर्फे सारंगखेडा ९, तोरखेडा येथे २४,  टेंभे तर्फे शहादा १०, बामखेडा तर्फे त-हाडी २२,  फेस १५,  पुसनद १९, सोनवद तर्फे शहादा १९, कानडी तर्फे शहादा ११,  मनरद १७, सारंगखेडा ३६,  डामरखेडा २२, मोहिदे तर्फे शहादा ३१,  कोटबांधणी १७, राणीपूर ३१, नागझिरी १२ तर  असलोद  ग्रामपंचायतीसाठी ३० उमेदवार नशिम आजमावत आहेत. एकूण १९८ महिला आणि २५१ पुरूष उमेदवारांचा या निवडणूकीत सहभाग आहे. निवडून येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असल्याने निवडणूक लढवणारे प्रभागात फे-या मारुन स्वत:ची उमेदवारी कशासाठी यावर भाष्य करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रामुख्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून पोस्टर वाॅर सुरु झाल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी बॅनरबाजी करत पॅनलची माहिती देण्यात आली आहे. यातून गावांतील मुख्य चाैकात पॅनल्सचे बॅनरही समोरासमोर आहेत. 

मोहिदे ग्रामपंचायतीकडे लागले लक्ष  
           शहादा शहराला लागून असलेल्या मोहिदे तर्फे शहादे अर्थात मामाचे मोहिदे गावाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. पाच प्रभाग आणि ५ हजार ११ मतदारांची ही ग्रामपंचायत यंदा बिनविरोध होणार अशी चर्चा सुरुवातीपासून रंगली होती. परंतू ऐनवेळी बोलण्या फिस्कटल्याने गावात निवडणूक लढवली जात असल्याचे बोलले जात आहे. ग्रामपंचायतीसाठी एकूण ४१ अर्ज वैध ठरले होते. यातील १० अर्ज मागे घेतले गेल्याने ३१ उमेदवार पाच प्रभागात निवडणूक लढवत आहेत. या ग्रामपंचायतीसाठी प्रचार यंत्रणा ही हायटेक असल्याचे सांगण्यात आले आहे. गावातील सत्ताधारी गटाकडून मतदारांना विकास कामे केल्याचे वारंवार पटवून देत असून विरोधी पॅनलकडून ते मुद्दे खोडून काढत प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे. दर दिवशी दोन्ही गटांचा निव्वळ प्रचार पाहून मतदारांचे मनोरंजन होत आहे. 

   ७१ प्रभागात लढती 
२७ ग्रामपंचायतींच्या ८९ प्रभागात हा निवडणूक कार्यक्रम होता. यातील सहा ग्रामपंचायतीं बिनविरोध झाल्याने १८ प्रभागातील निवडणूक थांबली आहे. 
सहा ग्रामपंचायतींमध्ये ५ हजार ३४६ मतदार होते. बिनविरोध ग्रामपंचायती झाल्याने येथील मतदान प्रक्रिया थांबली आहे.

   ४३ हजार मतदार 
२१ ग्रामपंचायतींसाठी एकूण ४३ हजार मतदार मतदान करणार आहेत. यासाठी मतदान केंद्रे तयार करण्याचे काम प्रशासन करत आहे. १० रोजी याठिकाणीही मतदान प्रशिक्षण करण्यात येणार आहे. 
 तालुक्यातील सारंगखेडा ही सहा प्रभाग आणि ६ हजार ३०४ मतदार असलेले मोठी ग्रामपंचायत आहे.  

असलोद येथे दुस-या क्रमांकाचे अर्ज 

निवडणूकीसाठी सर्वाधिक ७२ अर्ज हे सारंगखेडा ग्रामपंचायतीत दाखल झाले होते. तर असलोद ग्रामपंचायतीसाठी ४४ अर्ज दाखल झाले होते. 

Web Title: Campaign for two-way and three-way fights in 21 gram panchayats in Shahada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.