समाजकार्य महाविद्यालयाचे कोठार येथे शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:06 IST2019-12-31T13:06:12+5:302019-12-31T13:06:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील कोठार येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व महात्मा फुले ...

Camp at Kothar of Social Work College | समाजकार्य महाविद्यालयाचे कोठार येथे शिबिर

समाजकार्य महाविद्यालयाचे कोठार येथे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील कोठार येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन मंगला जगन नाईक या दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी मोहिदे येथील उपसरपंच आनंदराव चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून कोठारचे ग्रामपंचायत सदस्य हुपसिंग नाईक उपस्थित होते. आनंदराव चौधरी यांनी ग्रामविकासात युवकांच्या योगदानाविषयी माहिती दिली.
या शिबिरात स्त्री हक्क, पेसा कायदा, रक्तदान, पशुसंवर्धन, ग्रामविकास यासह विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान होणार आहे. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रमोद जाधव तर आभार प्रा.उषा वसावे यांनी मानले. शिबिरासाठी प्राचार्य डी.एम. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Camp at Kothar of Social Work College