हाटमोहिदे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:40 IST2020-08-23T12:40:28+5:302020-08-23T12:40:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील हाटमोहिदे शिवारात सुनील धनराज मराठे यांच्या शेतात बिबट्याने हल्ला करून गाय ...

A calf was killed in a leopard attack in Hatmohide Shivara | हाटमोहिदे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

हाटमोहिदे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील हाटमोहिदे शिवारात सुनील धनराज मराठे यांच्या शेतात बिबट्याने हल्ला करून गाय व वासरूवर हल्ला करून वासरू फस्त केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, हाटमोहिदे शिवारात बिबट्याचे वास्तव्य असल्याची चर्चा होती. काहींना तो दिसलाही होता. त्यामुळे घबराटीचे वातावरण होते. दोन दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास सुनील धनराज मराठे यांच्या शेतात बिबट्याने गाय व वासरुवर हल्ला केला. त्यात वासरु ठार झाले. याबाबत तेथील पोलीस पाटलांनी नंदुरबार वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी एस.एम. पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती जाणून घेतली व शेतकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या. घटनास्थळी दोन-तीन दिवस सायंकाळी चार वाजेनंतर व पहाटे कोणी येऊ नये, असे सांगितले. वासरू ठार केलेल्या शेतकºयाचा अर्ज घेऊन नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंचनामा करून देण्याचे सांगितले.
शेतकºयांना याठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळून आले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकºयांनी केली. मात्र पिंजरा उपलब्ध नसल्याने ते शक्य नसल्याचे सांगितले. पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठांना माहिती द्यावी लागते. त्यांच्या सूचनेनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे एस.एम. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शेतमजूर व शेतकºयांनी शेतात जाताना आवाज करत जावे, शेकोटी लावावी किंवा गाणी वाजवावी त्यामुळे बिबट्या जवळ येणार नाही व नाही आपले संरक्षण करता येते, असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: A calf was killed in a leopard attack in Hatmohide Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.