केबल चोरी करणा:या एकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 11:47 IST2019-09-19T11:47:42+5:302019-09-19T11:47:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेत शिवारातून केबल व विजेचे तार चोरीचे सत्र खोंडामळी-भागसरी शिवारात सुरूच आहे. 16 रोजी ...

केबल चोरी करणा:या एकाविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेत शिवारातून केबल व विजेचे तार चोरीचे सत्र खोंडामळी-भागसरी शिवारात सुरूच आहे. 16 रोजी रात्री पुन्हा सात ते आठ शेतक:यांची 15 हजार 800 रुपये किंमतीची केबल चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत भागसरी येथीलच एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्रसिंग दौलतसिंग गिरासे, रा.भागसरी, ता.नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. खोंडामळी-भागसरी शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून केबल व वीज तारा चोरीचे सत्र सुरू आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वीज कंपनीच्या तारा देखील चोरीस गेल्याने गुन्हे दाखल आहेत. 16 रोजी रात्री पुन्हा सात ते आठ शेतक:यांच्या केबल चोरीस गेल्याची बाब शेतक:यांना समजली. साधारण 660 फूट लांब आणि 15 हजार 840 रुपये किंमत असलेली केबल चोरटय़ाने चोरून नेली. शेतक:यांना याबाबत भागसरी गावातील महेंद्रसिंग दौलतसिंग गिरासे यांच्यावर संशय आल्याने निंबा टिकाराम पाटील, रा.खोंडामळी यांनी फिर्याद दिल्याने गिरासे यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.