शहादा सीसीआय केंद्रात तीन दिवसात २५ हजार क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:34 IST2020-02-13T12:34:47+5:302020-02-13T12:34:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा बाजार समितींतर्गत सीसीआयच्या केंद्रात तीन दिवसात २९० वाहनांमधून तब्बल २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक ...

शहादा सीसीआय केंद्रात तीन दिवसात २५ हजार क्विंटल कापूस खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा बाजार समितींतर्गत सीसीआयच्या केंद्रात तीन दिवसात २९० वाहनांमधून तब्बल २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी आणला आहे़ हा कापूस मोजून ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने सीसीआयचे केंद्र शुक्रवारपासून पुन्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे़
सोमवारी हे केंद्र सुरुळीतपणे सुरु करुन कापूस खरेदीलाही सुरुवात करण्यात आली होती़ परंतू रविवार ते बुधवार या तीन दिवसात तब्बल २९० चवाहने दाखल झाली़ सोमवारी तब्बल १३ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली होती़ तर मंगळवारी आणि बुधवारी वाहनांमधील कापूस मोजणी सुरु होती़ या वाहनातून किमान १३ हजार क्विंटल कापूस आवक होणार असल्याने त्याची मोजणी करुन तयार गाठी तयार करण्यासाठी तेवढ्या क्षमतेच्या जिनिंग उपलब्ध नसल्याने अडचणी वाढणार आहेत़ यातून सीसीआयने बाजार समितीला पत्र देत पुढील सूचना मिळेपर्यंत खरेदी बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत़
शहादा केंद्राने दीड लाख क्विंटलाचा टप्पा पार पाडला आहे़ येथे दररोज कापूस आवक वाढतच असल्याने कापूस साठा करण्याची समस्या उद्भवत आहे़ येत्या काळात केंद्र नेमके कधी सुरु होणार याची ठोस माहिती मात्र मिळू शकलेली नाही़
दरम्यान नंदुरबार केंद्रात मात्र कापूस खरेदी सुरळीत राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ नंदुरबार केंद्राने बुधवारी ६५ हजार क्विंटल कापूस खरेदीचा टप्पा पार केला आहे़ केंद्राला गोडावून मिळाल्याने त्यांची खरेदीची क्षमता वाढली आहे़ शेतकऱ्यांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी केवळ शनिवार आणि रविवार हे केंद्र बंद राहणार आहे़