शहादा येथे फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:51 IST2020-02-01T13:51:18+5:302020-02-01T13:51:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरातील खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलातील खाजगी फायनान्स कंपनीचे आॅफिस फोडून चोरट्यांनी रोख ...

शहादा येथे फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलातील खाजगी फायनान्स कंपनीचे आॅफिस फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व मोबाईल लंपास केला़ ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली़
खरेदी विक्री संघाच्या संकुलात नाकोडा आॅटो फायनान्सचे कार्यालय आहे़ गुरुवारी सकाळी कार्यालयाचे शटर तोडल्याचे दिसून आल्यानंतर संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती़ चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश करत २४ हजार २०० रुपये आणि १ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे निदर्शनास आले होते़
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसात धाव घेत घटनेची माहिती दिली होती़ याप्रकरणी नितीन विजयकुमार यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या घटनेचा तपास पोलीस नाईक गावीत करत आहेत़ शहाद्यात सातत्याने चोरी गुन्हे घडत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे़