लोणखेडा बायपास रस्त्यावर बस व टेम्पोचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:23 IST2019-06-30T12:23:33+5:302019-06-30T12:23:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील लोणखेडा  बायपास रोडवर शनिारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बस व टेम्पोचा अपघात झाल्याची ...

Bus and tempo accident on Lonkheba bypass road | लोणखेडा बायपास रस्त्यावर बस व टेम्पोचा अपघात

लोणखेडा बायपास रस्त्यावर बस व टेम्पोचा अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील लोणखेडा  बायपास रोडवर शनिारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बस व टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली.
लोणखेडा बायपास रस्त्यावरील भाऊतात्या पेट्रोल पंपाजवळ शनिवारी सकाळी दहा वाजेचा सुमारास शहादा -मंदाणे- घोटाळी बस (क्रमांक एम.एच. 20 बी.एल. 2305) व मालवाहतूक करणारा टेम्पो (क्रमांक एम.एच. 04 जीआर 5913) यांच्यात अपघात झाला. भाऊतात्या पेट्रोलपंपाजवळ चौफुली असून मंदाणे, लोणखेडा, शहादा व खेतियाकडे जाणारे रस्ते आहेत. त्यामुळे या चौफुलीवर वाहनांची नेहमी वर्दळ असते. चौफुलीजवळ गतिरोधक नसल्याने सर्वच वाहने वेगाने धावतात. त्यामुळे अपघात होतात. शनिवारी रस्ता ओलांडताना बस व टेम्पोचा अपघात झाला. त्यात बसचा स्टेअरिंग रॉड तुटला तर मालवाहतूक गाडीचा पुढील भाग दाबला गेल्याने नुकसान झाले. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. या अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
 

Web Title: Bus and tempo accident on Lonkheba bypass road