जिल्हा रुग्णालय कर्मचारी वसाहतीत घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:33+5:302021-03-27T04:31:33+5:30

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीत घरफोडी होऊन चोरट्यांनी ३४ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत शहर पोलिसात ...

Burglary in District Hospital Staff Colony | जिल्हा रुग्णालय कर्मचारी वसाहतीत घरफोडी

जिल्हा रुग्णालय कर्मचारी वसाहतीत घरफोडी

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीत घरफोडी होऊन चोरट्यांनी ३४ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालयात नर्स असलेल्या कोमल बबन विभुते यांचे निवासस्थान जिल्हा रुग्णालय आवारातील सातपुडा बिल्डींगमध्ये आहे. त्या रात्री ड्युटीवर गेल्या असता त्यांच्या घराचा बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याचे पॅंडेल व घड्याळ असा एकुण ३४ हजार ६०० रुपयांच्या ऐवजचा समावेश आहे.

सकाळी त्या ड्युटीवरून परत आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने शहर पोलिसांना कळविले. पोलिसांनी पंचनामा केला. कोमल विभुते यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पवार करीत आहे.

Web Title: Burglary in District Hospital Staff Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.