शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणारा तीन तासात अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील नागाई नगरातून चोरट्याने ६७ हजार रुपयांचे ४ मोबाईल व ४ सिमकार्ड चोरुन नेल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील नागाई नगरातून चोरट्याने ६७ हजार रुपयांचे ४ मोबाईल व ४ सिमकार्ड चोरुन नेल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती़ चोरीच्या घटनेनंतर एलसीबीच्या पथकाने अट्टल घरफोड्यास अवघ्या तीन तासात ताब्यात घेतले आहे़दिपक दानुमल हिंदुजा यांच्या मालकीच्या घरातून २४ रोजी पहाटे झालेल्या चोरीप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना चोरटा दिसून आला होता़ एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी सीसीटीव्ही तपासले असता, चोरटा चंद्रशेखर नथ्थू मेश्राम रा़ चिंचपाडा भिलाटी असल्याची खात्री पटली होती़ त्यानुसार त्याचा शोध सुरु होता़ दरम्यान चंद्रशेखर हा खांडबारा येथे असल्याची खबर पथकाला मिळाली होती़ तेथून त्याला पथकाने ताब्यात घेत त्याच्याकडून ६८ हजार रुपयांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले़ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नवले, पोलीस नाईक राकेश मोरे, प्रमोद सोनवणे, पोलीस शिपाई किरण मोरे, मोहन ढमढेरे आदींनी केली़