घरफोडी करणारा तीन तासात अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:18 IST2019-12-26T12:17:58+5:302019-12-26T12:18:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील नागाई नगरातून चोरट्याने ६७ हजार रुपयांचे ४ मोबाईल व ४ सिमकार्ड चोरुन नेल्याची ...

घरफोडी करणारा तीन तासात अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील नागाई नगरातून चोरट्याने ६७ हजार रुपयांचे ४ मोबाईल व ४ सिमकार्ड चोरुन नेल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती़ चोरीच्या घटनेनंतर एलसीबीच्या पथकाने अट्टल घरफोड्यास अवघ्या तीन तासात ताब्यात घेतले आहे़
दिपक दानुमल हिंदुजा यांच्या मालकीच्या घरातून २४ रोजी पहाटे झालेल्या चोरीप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना चोरटा दिसून आला होता़ एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी सीसीटीव्ही तपासले असता, चोरटा चंद्रशेखर नथ्थू मेश्राम रा़ चिंचपाडा भिलाटी असल्याची खात्री पटली होती़ त्यानुसार त्याचा शोध सुरु होता़ दरम्यान चंद्रशेखर हा खांडबारा येथे असल्याची खबर पथकाला मिळाली होती़ तेथून त्याला पथकाने ताब्यात घेत त्याच्याकडून ६८ हजार रुपयांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले़
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नवले, पोलीस नाईक राकेश मोरे, प्रमोद सोनवणे, पोलीस शिपाई किरण मोरे, मोहन ढमढेरे आदींनी केली़