शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

बैलांचा साज झाला यंदा फिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 1:16 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम पोळ्यासाठी साज तयार करण्यावरही झाला आहे. साज तयार करणाऱ्या बद्रीझिरा, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम पोळ्यासाठी साज तयार करण्यावरही झाला आहे. साज तयार करणाऱ्या बद्रीझिरा, ता.नंदुरबार येथे यंदा केवळ ३० ते ३५ टक्केच साज तयार केले गेले आहेत. त्यामुळे यंदा बैलांचे साज महागणार असल्याचे स्पष्ट आहे. शिवाय अनेक कुटूंबाना त्याचा आर्थिक फटका देखील बसला आहे.नंदुरबारपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बद्रीझिरा गावातील बंजारा कुटूंब दरवर्षी बैलांचे साज तयार करतात. पोळ्याच्या आधी दीड ते दोन महिने यासाठी प्रत्येक घरातील कुटूंब तयारीला लागते. दोन महिने या गावात एक वेगळाच उत्साह असतो. घरातील खोल्या, अंगण विक्रीसाठी तयार केलेल्या विविध रंगबेरंगी साजने सजून जाते. परंतु यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गावात सर्वच सुनेसूने आहे. संपुर्ण गावाऐवजी १० ते १२ कुटूंबांनेच यंदा मोजक्याच संख्येने साज तयार केले आहेत.पारंपारिक कलाकुसरगेल्या तीन ते चार पिढ्यांची परंपरा टिकवून ठेवत बद्रीझिºयातील बंजारा कुटुंबे आपल्यातील कलाकार जिवंत ठेवत आहेत. बैलांचा साज पाहण्यास सहजसोपा वाटत असला तरी त्यातील गुंफण आणि कलाकुसर बरीच मेहनतीची आहे. बद्रीझिºयातील २५ ते ३० कुटुंबे या व्यवसायात आहेत. विविध आठ ते दहा प्रकारचे साज येथे बनविण्यात येतात. त्यासाठी लागणारे साधे व विविध रंगातील सूत जिल्ह्याबाहेरून मागवावे लागते. गावात सध्या चौथी पिढी हे काम करीत आहे. प्रत्येकाकडे कमी-अधिक प्रमाणात शेती आहे. काही मजुरी करणारी कुटुंबे आहेत. परंतु बैलपोळ्याच्या महिनाभर आधीपासून ते या कामाला सुरुवात करतात.आताची पिढी आधुनिक व शिक्षित असल्यामुळे काहीजण हे काम टाळतात, परंतु वडीलधारी मंडळी जमेल तेवढी कामे करून आपल्यातील कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र येथे दिसून येते.कच्चा माल देऊन तयार...पूर्वी काही कुटुंबे स्वत: साज तयार करून ते बाजारात विक्री करीत असत. परंतु महागाई आणि कच्चा माल घेण्यासाठी लागणारे भांडवल परवडणारे नसल्यामुळे मजुरीच्या स्वरूपात ही कामे केली जातात. नंदुरबारसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील काही व्यापारी या कुटुंबांकडून विविध वस्तू तयार करून घेतात. त्यासाठी त्यांना कच्चा माल पुरविला जातो. नगाप्रमाणे मजुरी देऊन वस्तू तयार केल्या जातात. त्यात दोरखंड, नाथ, मोरखी, गोंडा, सिरधा, सेल, जोधा आदी वस्तूंचा समावेश करता येईल. काही कुटुंबे स्वत:च कच्चा माल आणून वस्तू तयार करतात व स्वत:च बाजारात विक्रीदेखील करतात.कोरोनाचा फटकापशुधनाची कमी होत चालेली संख्या, शेतीची कामे आधुनिक यंत्राने करण्याची ओढ, यंदाची दुष्काळी स्थिती यामुळे गेल्या काही वर्षांपासून कमी प्रमाणात वस्तू तयार होणार असल्याचे किसन पवार यांनी सांगितले. यंदा तर कोरोनाने सर्वच बाबींवर पाणी फिरविले आहे. लॉकडाऊन आणि वाहनांची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला वेळेवर कच्चामाल मिळू शकला नाही. त्यामुळे अनेक कुटूंबांना इच्छा असूनही हे काम करता आले नाही. काहींनी नंदुरबारातून कच्चा माल आणून वस्तू बनविल्या आहेत.४नंदुरबारच नव्हे तर खान्देशात बद्रीझिरा हे गाव बैलांचा साज तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील कला कुसरला खान्देशात तोड नाही.४दोरखंड, नाथ, मोरखी, गोंडा, सिरधा, सेल, जोधा आदी साज येथे तयार केले जातात. घरातील वयोवृद्धांपासून तर लहानग्यांपर्यंत अनेकजण यात सहभागी होत असतात.४किमान दोन महिने हे काम येथील कुटूंबाला मिळते. शेती कामासह हे काम करतांना त्यांची दुहेरी कसरत होते.लॉकडाऊनमुळे यंदा वेळेवर कच्चामाल मिळू शकला नाही. नंदुरबारमधून जेवढा मिळाला त्यावर साज तयार करण्यात आले. यंदा केवळ १० ते १२ कुटूंबच यात सहभागी झाले. त्यामुळे साज बनविणाºया इतर कुटूंबांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे.-किसन पवार, बद्रीझिरा.