बैलांचा साज झाला यंदा फिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 01:16 PM2020-08-13T13:16:32+5:302020-08-13T13:16:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम पोळ्यासाठी साज तयार करण्यावरही झाला आहे. साज तयार करणाऱ्या बद्रीझिरा, ...

The bulls were pale this year | बैलांचा साज झाला यंदा फिका

बैलांचा साज झाला यंदा फिका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम पोळ्यासाठी साज तयार करण्यावरही झाला आहे. साज तयार करणाऱ्या बद्रीझिरा, ता.नंदुरबार येथे यंदा केवळ ३० ते ३५ टक्केच साज तयार केले गेले आहेत. त्यामुळे यंदा बैलांचे साज महागणार असल्याचे स्पष्ट आहे. शिवाय अनेक कुटूंबाना त्याचा आर्थिक फटका देखील बसला आहे.
नंदुरबारपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बद्रीझिरा गावातील बंजारा कुटूंब दरवर्षी बैलांचे साज तयार करतात. पोळ्याच्या आधी दीड ते दोन महिने यासाठी प्रत्येक घरातील कुटूंब तयारीला लागते. दोन महिने या गावात एक वेगळाच उत्साह असतो. घरातील खोल्या, अंगण विक्रीसाठी तयार केलेल्या विविध रंगबेरंगी साजने सजून जाते. परंतु यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गावात सर्वच सुनेसूने आहे. संपुर्ण गावाऐवजी १० ते १२ कुटूंबांनेच यंदा मोजक्याच संख्येने साज तयार केले आहेत.
पारंपारिक कलाकुसर
गेल्या तीन ते चार पिढ्यांची परंपरा टिकवून ठेवत बद्रीझिºयातील बंजारा कुटुंबे आपल्यातील कलाकार जिवंत ठेवत आहेत. बैलांचा साज पाहण्यास सहजसोपा वाटत असला तरी त्यातील गुंफण आणि कलाकुसर बरीच मेहनतीची आहे. बद्रीझिºयातील २५ ते ३० कुटुंबे या व्यवसायात आहेत. विविध आठ ते दहा प्रकारचे साज येथे बनविण्यात येतात. त्यासाठी लागणारे साधे व विविध रंगातील सूत जिल्ह्याबाहेरून मागवावे लागते. गावात सध्या चौथी पिढी हे काम करीत आहे. प्रत्येकाकडे कमी-अधिक प्रमाणात शेती आहे. काही मजुरी करणारी कुटुंबे आहेत. परंतु बैलपोळ्याच्या महिनाभर आधीपासून ते या कामाला सुरुवात करतात.
आताची पिढी आधुनिक व शिक्षित असल्यामुळे काहीजण हे काम टाळतात, परंतु वडीलधारी मंडळी जमेल तेवढी कामे करून आपल्यातील कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र येथे दिसून येते.
कच्चा माल देऊन तयार...
पूर्वी काही कुटुंबे स्वत: साज तयार करून ते बाजारात विक्री करीत असत. परंतु महागाई आणि कच्चा माल घेण्यासाठी लागणारे भांडवल परवडणारे नसल्यामुळे मजुरीच्या स्वरूपात ही कामे केली जातात. नंदुरबारसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील काही व्यापारी या कुटुंबांकडून विविध वस्तू तयार करून घेतात. त्यासाठी त्यांना कच्चा माल पुरविला जातो. नगाप्रमाणे मजुरी देऊन वस्तू तयार केल्या जातात. त्यात दोरखंड, नाथ, मोरखी, गोंडा, सिरधा, सेल, जोधा आदी वस्तूंचा समावेश करता येईल. काही कुटुंबे स्वत:च कच्चा माल आणून वस्तू तयार करतात व स्वत:च बाजारात विक्रीदेखील करतात.
कोरोनाचा फटका
पशुधनाची कमी होत चालेली संख्या, शेतीची कामे आधुनिक यंत्राने करण्याची ओढ, यंदाची दुष्काळी स्थिती यामुळे गेल्या काही वर्षांपासून कमी प्रमाणात वस्तू तयार होणार असल्याचे किसन पवार यांनी सांगितले. यंदा तर कोरोनाने सर्वच बाबींवर पाणी फिरविले आहे. लॉकडाऊन आणि वाहनांची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला वेळेवर कच्चामाल मिळू शकला नाही. त्यामुळे अनेक कुटूंबांना इच्छा असूनही हे काम करता आले नाही. काहींनी नंदुरबारातून कच्चा माल आणून वस्तू बनविल्या आहेत.

४नंदुरबारच नव्हे तर खान्देशात बद्रीझिरा हे गाव बैलांचा साज तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील कला कुसरला खान्देशात तोड नाही.
४दोरखंड, नाथ, मोरखी, गोंडा, सिरधा, सेल, जोधा आदी साज येथे तयार केले जातात. घरातील वयोवृद्धांपासून तर लहानग्यांपर्यंत अनेकजण यात सहभागी होत असतात.
४किमान दोन महिने हे काम येथील कुटूंबाला मिळते. शेती कामासह हे काम करतांना त्यांची दुहेरी कसरत होते.

लॉकडाऊनमुळे यंदा वेळेवर कच्चामाल मिळू शकला नाही. नंदुरबारमधून जेवढा मिळाला त्यावर साज तयार करण्यात आले. यंदा केवळ १० ते १२ कुटूंबच यात सहभागी झाले. त्यामुळे साज बनविणाºया इतर कुटूंबांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे.
-किसन पवार, बद्रीझिरा.

Web Title: The bulls were pale this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.