५९ घरांवर चालणार बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:32 IST2021-02-17T12:32:32+5:302021-02-17T12:32:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील देवळीफळी व इस्लामपुरा भागातील एकूण ५९ घरांवर काही दिवसात बुलडोजर चालवले जाणार आहे. ...

५९ घरांवर चालणार बुलडोजर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील देवळीफळी व इस्लामपुरा भागातील एकूण ५९ घरांवर काही दिवसात बुलडोजर चालवले जाणार आहे. ५९ घरे विस्थापित करून शहरातदेखील महामार्ग चौपदरीकरणाचे काम काही दिवसात सुरू करण्यात येणार असून, सध्या उपजिल्हा रुग्णालयानजीक कामाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कंपनीने लवकरात लवकर महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दोन वर्षांपासून वाहनधारकांचे हाल
काही भागात राष्ट्रीय महामार्ग खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या कामाला गती मिळत असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे.
ब्रिटिशकालीन पूल जीर्ण
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाले असून, या पुलांवर अनेक अपघात होत असल्याने पुलांच्या कामांनादेखील गती देण्यात आली आहे. कोंडाईबारी घाटातील पूल, रायंगण पूल, रंगावली पूल व वाकीपाडा पूल जीर्ण झाले आहेत. त्यामुळे नवीन कामांनादेखील नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.
पुलामुळे शहराचे दोन भाग नाही
नवापूर शहरातील नागरिकांची महामार्ग निर्माण करताना शहरातून पूल न घेता केवळ चौपदरीकरण व सर्व्हिस रोड तयार करावा तसेच गुजरात राज्यातील सोनगड शहराचे महामार्गावरील ब्रीजमुळे दोन भाग पडले आहेत, तसे नवापुरात होणार नाही. पिंपळनेर चौफुलीजवळील शेतातून रंगावली नदीवरील पूल देवळफळीपर्यंत राहणार आहे. साधारण २५ स्तंभांचा हा पूल असणार आहे. देवळीफळीत एमआयडीसीकडे जाण्यासाठी एक बोगदा ठेवण्यात आला आहे. हा पूल देवळफळीत संपले, अशी माहिती प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली.
प्रवेशद्वार सर्वाधिक सुंदर व आकर्षक
जे.एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजर राजेश म्हात्रे यांनी माहिती दिली. नवापूर शहरातील स्व. हेमलता वळवी यांच्या पुतळ्याजवळ मोठे जंक्शन येणार असून, ते सर्वाधिक सुंदर व आकर्षक बवण्यात येणार आहे. रंगावली नदीवरून देवळफळीपर्यंत नवीन महामार्ग कसा असणार आहे याचे लेआऊट कंपनीने दिले आहे. तर नवापूर शहरातील प्रवेशद्वाराजवळ कसा महामार्ग असणार यांचादेखील प्लान दिला आहे.
ग्रामीण भागातील स्थलांतर कमी होईल
कच्च्या आणि पक्क्या मालाची ने-आण जरी या प्रकल्पाच्या निमित्ताने अधिक वेगवान झाली आणि स्थलांतराचा प्रश्न जरी अंशतः मार्गी लागला तरी आज ज्या नागरी सुविधा मोठ्या शहरांमध्ये अगदी सहज मिळतात त्या जर या महामार्गानजीकच्या भागातील लोकांनाही मिळू लागल्या तर आजच्या घडीला ग्रामीण भागातून शहरात होणारे आदिवासीबहुल भागातील स्थलांतरेसुद्धा कमी होतील. दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांवरील ७० टक्के काम पूर्ण