Build a fortress in the Women's Board School | महिला मंडळाच्या शाळेत गड-किल्ले बनवा स्पर्धा
महिला मंडळाच्या शाळेत गड-किल्ले बनवा स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : महिला मंडळ संस्थेच्या येथील प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी गड-किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी संस्थेचे सचिव अ‍ॅड.राजेश कुलकर्णी, मुख्याध्यापिका ताराबाई बेलदार, चतुर्भुज शिंदे उपस्थित होते. शाळेतील तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गड-किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या काळात लहान मुले व विद्यार्थी मोबाईलचा जास्त वापर करीत असून मैदानी खेळ, इतिहास, महापुरुष याबद्दल त्यांना पाहिजे तेवढी माहिती नसते. यामुळे लहानपणी त्यांना इतिहास व शिवरायांचे विविध किल्ल्यांविषयी माहिती व्हावी या उद्देशाने शाळेच्या वतीने गड-किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. यात शिवनेरी, रायगड, प्रतापगड, जंजिरा, जलदुर्ग, रामशेज, पन्हाळा आधी किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या. विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका सुनिता पाटील, कविता पटले, पायल दोडवे, सुनिता सोनवणे, मेघा जगताप, ज्योती पालकडे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Build a fortress in the Women's Board School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.