डीबीटी योजना बंदसह इतर मागण्यांसाठी बीटीएसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:31+5:302021-02-06T04:58:31+5:30

नंदुरबार-तळोदा आदिवासी प्रकल्पांतर्गत येणार्‍या विविध २० समस्यांचे निवारण करण्यासाठी निवेदन आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांना दिले होते. त्यात डीबीटी योजना ...

BTS's bear agitation for other demands including closure of DBT scheme | डीबीटी योजना बंदसह इतर मागण्यांसाठी बीटीएसचे धरणे आंदोलन

डीबीटी योजना बंदसह इतर मागण्यांसाठी बीटीएसचे धरणे आंदोलन

नंदुरबार-तळोदा आदिवासी प्रकल्पांतर्गत येणार्‍या विविध २० समस्यांचे निवारण करण्यासाठी निवेदन आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांना दिले होते. त्यात डीबीटी योजना बंद करावी, आश्रमशाळेतील बांधकामाचा प्रश्‍न, विद्यार्थ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, योजनांना आदिवासी क्रांतिकारी महापुरुषांच्या नावे देण्यात यावीत आदी महत्त्वाच्या प्रश्‍नांचा समावेश होता. यापूर्वी आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र या गोष्टीला एक वर्ष उलटत आले आहे. तरी देखील प्रशासन व राजकीय स्तरावर कोणत्याही मागण्यांचा निपटारा करण्यात आला नाही. याची आठवण करून देण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याची माहिती भारतीय ट्रायबल पार्टीचे जिल्हाध्यक्ष के.टी. गावीत यांनी दिली.

Web Title: BTS's bear agitation for other demands including closure of DBT scheme