घरात डांबून ठेवत विवाहितेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:35 IST2020-02-10T12:35:03+5:302020-02-10T12:35:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला केरळ येथे फिरण्यास नेवून तेथे खोलीत डांबून ठेवून अत्याचार करणाऱ्या ...

घरात डांबून ठेवत विवाहितेवर अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला केरळ येथे फिरण्यास नेवून तेथे खोलीत डांबून ठेवून अत्याचार करणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील माहेर असणाºया व पुणे येथील सासर असणाºया विवाहितेने फिर्याद दिली आहे. २०१६ मध्ये विवाहितेचा पुणे येथील संदीप नाथा मन्वरे यांच्याशी विवाह झाला होता. विवाहात मानपान दिला नाही म्हणून वाईट वागणूक दिली जात होती. वारंवार चारित्र्यावर संशय घेतला जात होता. घरात शिळे अन्न खाण्यास दिले जात होते. केरळ येथे फिरण्यास गेले असता तेथे खोलीत डांबून ठेवले जात होते. शिवाय अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले जात होते. पतीसह सासरच्या मंडळींनी गेल्या चार वर्षात पुणे, नाशिक मुंबई येथे केलेल्या अत्याचाराला कंटाळून विवाहितेने नंदुरबार उपनगर पोलिसात फिर्याद दिल्याने संदीप नाथा मन्वरे, नाथा शंकर मन्वरे, रंजना नाथा मन्वरे, योगेश नाथा मन्वरे, शिल्पा मन्वरे व संतोष मन्वरे, शिल्पा मन्वरे सर्व रा.पुणे यांच्याविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक भापकर करीत आहे.