खातगाव येथे बहिणीची छेड काढून भावाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 21:14 IST2019-11-01T21:14:32+5:302019-11-01T21:14:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खातगाव ता़ नवापुर येथे बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणा:या भावाला दोघांनी मारहाण करुन जखमी ...

खातगाव येथे बहिणीची छेड काढून भावाला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खातगाव ता़ नवापुर येथे बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणा:या भावाला दोघांनी मारहाण करुन जखमी केल़े ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता घडली होती़
खातगाव येथील चेतन जया वसावे याच्या बहिणीची योगेश दामू वसावे व किरण महेंद्र वसावे या दोघांनीही छेड काढली होती़ याचा जाब विचारण्यासाठी चेतन हा दोघांकडे गेला असता, योगेश याने हातातील सळईने चेतन याच्या डोक्यात वार केला़ तसेच किरण वसावे याने चेतन यास धरुन ठेवत हाताबुक्कीने मारहाण केली़ याप्रकरणी चेतन वसावे याने विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन योगेश व किरण वसावे दोघे रा़ खातगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गावीत करत आहेत़