लेखी आणा, मग आदेशाचेे बोला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:59+5:302021-09-06T04:34:59+5:30

काही दिवसांपूर्वी शहादामधील एका इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये एक पालक पास झालेल्या आपल्या पाल्याचा दाखला आणण्यासाठी गेले. मुख्याध्यापक व क्लर्कने ...

Bring in writing, then say the order ... | लेखी आणा, मग आदेशाचेे बोला...

लेखी आणा, मग आदेशाचेे बोला...

काही दिवसांपूर्वी शहादामधील एका इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये एक पालक पास झालेल्या आपल्या पाल्याचा दाखला आणण्यासाठी गेले. मुख्याध्यापक व क्लर्कने मागील दोन वर्षांचं रेकॉर्ड काढून तुम्हाला सगळी थकीत फी भरावी लागेल आणि मगच दाखला मिळेल, असं ठणकावून सांगितलं. त्यावर त्या पालकाने कोरोनाच्या कालावधीतील फी वसुली करता येणार नाही, असे सरकारने अनेक वेळा घोषित केले आहे. तुम्हालाही तसे करता येणार नाही, असं सांगितलं. त्यावर वसुलीत पटाईत असलेल्या मुख्याध्यापकांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना घोषणा करायला काय जातंय. सरकार तसंच सांगत असतं, पण आम्हाला लेखी आदेश काढत नाही. वीजबिलाबाबतही सरकारने तसंच अनेक वेळा सांगितलं होतं. झालं का बिल माफ.. नाही ना..? असा प्रतिप्रश्न पालकांना केला. मग हे कसं माफ होईल... चला भरा पैसे म्हणून सांगताच पालकांची बत्ती गुल झाली.

- राधेश्याम कुलथे

Web Title: Bring in writing, then say the order ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.