शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

देशात व राज्यातही बळीचे राज्य आणा- छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टाळण्यासाठी व बळीराजाचे राज्य देशात व राज्यात येण्यासाठी सर्वानी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : दिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टाळण्यासाठी व बळीराजाचे राज्य देशात व राज्यात येण्यासाठी सर्वानी एकजूट व्हा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शहादा येथे रविवारी समता मेळाव्यात बोलताना केले. हे सरकार मनुवाद्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.समता परिषदेतर्फे रविवारी दुपारी बाजार समितीच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समता मेळावा झाला. या वेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी,  सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, राष्ट्रवादीचे धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, सतीश महाले, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, ईश्वर पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, पं.स. सभापती दरबारसिंग पवार, जि.प. सभापती आत्माराम बागले, समता परिषदेचे राजेंद्र माळी, विनोद अहिरे, ईश्वर वारुळे, जगदीश माळी, रमाशंकर माळी  आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  मनुग्रंथाने पाच हजार वर्षे लोकांना माणुसकीच्या हक्कापासून दूर ठेवले. महिलांना कोणत्याही प्रकारची स्वतंत्रता दिली नव्हती असे सांगून छगन भुजबळ पुढे म्हणाले की, बहुजनांनी कष्टाने मिळविलेली संपत्ती जमा करण्याचा अधिकारही मनुस्मृतीने त्यांना दिला नव्हता. डॉ.आंबेडकरांनी सर्वाना समान अधिकार दिला. बाबासाहेबांनी बहुजन समाजाला सर्व अधिकार मिळवून दिला. मनुवाद पुन्हा पुढे आणला जात आहे असे सांगून संभाजी भिडे मनुवाद जोपासत असल्याचा आरोप केला. संतांपेक्षा मनु मोठा असल्याचे भिडे सांगतात, हे थांबवले पाहिजे. लढण्याची शक्ती हृदयापासून लागते. हिंमत असेल तर लढायला वय आडवे येत नाही. मोदी सरकारवर टीका करताना भुजबळ म्हणाले की, हे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी असे आहे. काळा पैसा काढण्यासाठी केलेली नोटबंदीमुळे एक रुपयाही सरकारी तिजोरीत जमा झाला नाही. आतंकवाद अजूनही थांबलेला नाही. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एक कोटी लोकांचे धंदे बंद झाल्याचे सांगितले. बेरोजगारीच वाढली असून या सरकारने सहकार चळवळही मोडीत काढली आहे. शेतकरी, व्यापारी सारेच अडचणीत आले आहेत. हे सरकार खाली खेचण्यासाठी पक्षभेद न ठेवता सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले.राजेंद्रकुमार गावीत म्हणाले की, भुजबळ यांनी देशात मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली. त्यांनी अनेक छोटय़ा कार्यकत्र्याना बळ दिले. दीपक पाटील म्हणाले की, देशात जातीयवाद फोफावत आहे. सर्वाना सोबत घेऊन चालण्याची शिकवण स्व पी.के. अण्णांनी दिली आहे. परिसरात समता टिकवण्याचा प्रय} आम्ही करतो. आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, समता परिषद एखाद्या समाजापुरती मर्यादित नाही. मी जातीपातीचे राजकारण करीत नाही. सर्र्वानी सोबत राहून परस्परांना सहकार्य केले पाहिजे. युतीचे राज्य भुजबळांनी घालविले. त्यांनी अनेक आमदारांना घडविले. देशात द्वेषाचे राजकारण सुरु असल्याचे सांगून जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी आरक्षणाचा मुद्दा सोडवावा लागेल, असे स्पष्ट केले. कार्यक्रमास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय.चे पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी जि.प. सदस्य अभिजित पाटील, प्राचार्य मकरंद पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर मोरे, विजय विठ्ठल पाटील,  सुपडू खेडकर, अरविंद कुवर, घनश्याम निझरे, जयप्रकाश पाटील, अरविंद पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, रवींद्र राऊळ,  समता परिषदेचे हरीश सैंदाणे, सी.डी. बोडरे, यादव माळी, ईश्वर माळी, हिरालाल माळी, प्रवीण वाघ, मनोज वारुळे, संतोष माळी, पारस माळी, विठोबा माळी, आनंदा माळी, अनिल माळी, सुनील खलाणे, सतीलाल निजरे यांच्यासह समता परिषदेच्या कार्यकत्र्यानी मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रय} केले. प्रास्तविक राजेंद्र वाघ यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी तर आभार ईश्वर पाटील यांनी मानले. या वेळी छगन भुजबळ यांनी मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले. समता परिषदेतर्फे भुजबळांना सन्मानपत्र देण्यात आले. समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र वाघ यांच्या नियुक्तीची घोषणा करुन भुजबळ यांनी वाघ यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. कार्यक्रम तब्बल दोन तास उशिरा सुरू झाल्याने लोकांमध्ये चलबिचल सुरु झाली. मात्र छगन भुजबळ यांनी भाषणात शेरोशायरी करून टाळ्या मिळवल्या.  भुजबळांना निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कार्यकर्ते आणि पोलिसांना कसरत करावी लागली.