लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सात वर्षातच कोठवा नाल्यावरील पूल वाहून गेला. या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली नसल्यामुळे महाराष्टÑ व गुजरातमधील २२ खेड्यांचा संपर्क तुटला आहे.तळोदा तालुक्याच्या पूर्वेकडील अनेक गावांसह गुजरातमधील काही गावांच्या सोयीसाठी कोठवा नाल्यावर गुजरात शासनाकडून पुल बांधण्यात आला. पुलाचे ठिकाण व रस्ता गुजरातमध्ये येत असल्याने पुल गुजरातच्या बांधकाम विभागामार्फत १० वर्षांपूर्वी बांधण्यात आला. हा पूल सर्वाधिक गावांना सोयीचा ठरत होता. परंतु पुल बांधल्यानंतर केवळ सात वर्षातच वाहून गेला. कदाचित या पुलाचे बांधकामात दर्जा राखला गेला नसावा, असे म्हटले जात आहे.हा पुल तुटल्यामुळे तळोदा तालुक्यातील जुवाणी, धजापाणी, मालदा, तुळाजा, करडे, बन, न्युबन, लाखापूर या गावांमधील नागरिकांची गैरसोय होत आहे. या नारिकांना १५ किलो मिटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत असून त्यातून त्यांना आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. हा भूर्दंड टाळण्यासाठी पुलाची पुनर्बांणी होणष अत्यावश्यक आहे. त्यामुळे बांधकामासाठी दोन्ही राज्यातील नागरिकांमार्फत दोन्ही राज्याच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु नागरिकांच्या मागणीची कुठल्याच शासनाकडून दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे तीन वर्षांपासून नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. दोन्ही राज्यांकडून योग्य तोडगा काढत नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.४गुजरात शासनामार्फत १० वर्षापूर्वी या पुलाचे बांधकाम करण्यात आले. पुलाचे ठिकाण हे गुजरात हद्दीत येत असल्यामुळे हे काम गूजरातकडून करण्यात आले. परंतु पुल वाहून गेल्यानंतर हा पुल महाराष्टÑातील नागरिकांना सर्वाधिक सोयीचा ठरत आहे. त्यामुळे गुजरात शासनाने याच्या पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले जात आहे. एका बाजुने हा२२ पूल गुजरातच्या हद्दीत येत असल्याचे म्हणत महाराष्टÑ शासनाकडूनही या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी दखल घेतली जात नाही. त्यामुळे या पुलाचा नेमका तोडगा निघत नाही. परिणामी दोन्ही राज्यातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्याची सुंयुक्त बैठक घेण्यात यावी, अशा बैठकीतून योग्य मार्ग निघेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
२२ खेड्यांना जोडणाऱ्या पुलाची झाली वाताहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:19 IST