कचरा टाकण्याच्या कारणावरून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:24+5:302021-03-22T04:27:24+5:30

पोलीस सूत्रांनुसार, तळोदा शहरातील खर्डी नदीच्या काठावर रामदेव बाबा मंदिराजवळ एक महिलाने कचरा टाकला. त्यांना सदर ठिकाणी कचरा न ...

Breathless beating for throwing garbage | कचरा टाकण्याच्या कारणावरून बेदम मारहाण

कचरा टाकण्याच्या कारणावरून बेदम मारहाण

पोलीस सूत्रांनुसार, तळोदा शहरातील खर्डी नदीच्या काठावर रामदेव बाबा मंदिराजवळ एक महिलाने कचरा टाकला. त्यांना सदर ठिकाणी कचरा न टाकण्याचे सांगितले या कारणावरून जमाव चाल करून आला. लाला भरवाड, लक्ष्मण भरवाड, राजू भरवाड, गणेश भरवाड, गोगा भरवाड यांच्यासह एका अनोळखी महिला व इतर लोकांनी लाठ्या काठ्यानी लोखंडी पाईप, हाता बुक्क्याने मारहाण केली. त्यात पुजारी भरत सूर्यवंशी यांच्या पत्नी चंद्रकला सूर्यवंशी, वडील भालचंद्र नारायण सूर्यवंशी भाऊ संजय भालचंद्र सूर्यवंशी, पुतण्या कल्पेश संजय सूर्यवंशी, मुलगा मयूर भरत सूर्यवंशी, लहान मुलगा अमोल भरत सूर्यवंशी, पत्नी चंद्रकला भरत सूर्यवंशी, छबिबाई संजय सूर्यवंशी हे जखमी झाले. शिवाय संजय सूर्यवंशी यांच्या गळ्यातील १५ ग्राम सोन्याची चैन ६० हजार रुपये जबरदस्तीने लक्ष्मण भरवाड यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत भरत सूर्यवंशी यांनी पोलिसात फिर्याद दिल्यावरून जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे करीत आहे.

Web Title: Breathless beating for throwing garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.