ग्रामपंचायतींसाठी सज्ज झालेल्या इच्छुकांच्या तयारीला जातवैधतेच्या सक्तीने लावला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:10 IST2020-03-07T13:10:22+5:302020-03-07T13:10:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील १९ जिल्ह्यात १ हजार ५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे़ ...

'Breaks' forced by casteism in preparation for aspirants ready for gram panchayats | ग्रामपंचायतींसाठी सज्ज झालेल्या इच्छुकांच्या तयारीला जातवैधतेच्या सक्तीने लावला ‘ब्रेक’

ग्रामपंचायतींसाठी सज्ज झालेल्या इच्छुकांच्या तयारीला जातवैधतेच्या सक्तीने लावला ‘ब्रेक’

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यातील १९ जिल्ह्यात १ हजार ५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे़ यात नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यामधील ३८ ग्रामपंचायती समाविष्ट आहेत़ शुक्रवारपासून अर्ज भरण्याची मुदत सुरु झाली असली तरी शासनाने गेल्या वर्षी काढलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्राच्या अटीचा या निवडणूकीसाठी इच्छुकांना फटका बसला असून अनेकांचे स्वप्नही धुळीस मिळाले आहे़
जिल्ह्यातील शहादा, तळोदा, धडगाव आणि नवापुर या चार तालुक्यात निवडणूक कार्यक्रम लागू करण्यात आला आहे़ सर्व ३८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे़ यांतर्गत शुक्रवारपासून तालुकास्तरावर अर्ज भरण्यासाठी कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे़ यात सर्वाधिक ग्रामपंचायती ह्या धडगाव तालुक्यात आहेत़ बहुतांश सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच पदासाठी जागा ह्या अनुसुचित जमातींसाठी राखीव आहेत़ यामुळे सहज निवडणूक लढवली जाईल असा सर्वांचाच समज होता़ या समजावर २० सप्टेंबर २०१९ रोजी राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या अध्यादेशांमुळे पाणी फेरले गेले आहे़
या आदेशानुसार राखीव जागेसाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे़ या निर्णयाची बऱ्याच ठिकाणी माहिती नसल्याने शुक्रवारी इच्छुकांचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले़ यातून काहींनी पर्यायी मार्ग काढत इतरांना तयार करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता़दरम्यान येत्या १३ मार्चपर्यंत जातवैधता प्रमाणपत्राविना अर्ज दाखल करणाऱ्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे़

४शहादा तालुक्यातील असलोद, न्यू असलोद, राणीपूर, नागझिरी आणि कोटबांधणी, तळोदा तालुक्यातील बंधारा, राणीपूर, पाडळपूर, नवापुर तालुक्यातील धनराट, धुळीपाडा, वडकंळबी, उकळापाणी, रायंगण, कोठडा, नांदवण, उमराण, केडापाडा, बंधारपाडा, केळी, ढोंग, पळसून आणि सागाळी, धडगाव तालुक्यातील धनाजे बुद्रुक, भोगवाडे खुर्द, उमराणी बुद्रुक, घाटली, खामला, काकरदा, आचपा, मुंदलवड, मनवाणी, खर्डा, सिसा, काकरपाटी, पाडली़ वरखेडी बुद्रुक, कुंडल आणि हातधुई या ग्रामपंचायतीत निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे़६ ते १३ मार्च दरम्यान नामनिर्देशन करुन अर्जांची छाननी १६ मार्च रोजी होणार असून १८ रोजी माघारीची अंतीम मुदत आहे़ मतदान केंद्रांवर २९ मार्च रोजी मतदान होणार आहे़

एकीकडे जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती अस्वस्थता करत असताना दुसरीकडे पाच दिवसांचा आठवडाही मारक ठरण्याची चिन्हे आहेत़ अर्ज दाखल करण्याच्या वेळेत शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस सलग सुट्या आल्या आहेत़ त्यातही १० रोजी एक दिवस सुटी असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी चारच दिवस मिळणार आहेत़

Web Title: 'Breaks' forced by casteism in preparation for aspirants ready for gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.