दक्षिण काशीत धार्मिक विधी बंद असल्याने ब्रह्मवृंंद संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:53 IST2020-08-02T12:53:41+5:302020-08-02T12:53:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : दक्षिण काशी म्हणून नावलौकिक असलेल्या प्रकाशा येथे वर्षभर विविध धार्मिक उपक्रमांसाठी देशभरातील भाविक वर्षभर ...

Brahmavrind in crisis as religious rituals are closed in South Kashi | दक्षिण काशीत धार्मिक विधी बंद असल्याने ब्रह्मवृंंद संकटात

दक्षिण काशीत धार्मिक विधी बंद असल्याने ब्रह्मवृंंद संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : दक्षिण काशी म्हणून नावलौकिक असलेल्या प्रकाशा येथे वर्षभर विविध धार्मिक उपक्रमांसाठी देशभरातील भाविक वर्षभर भेटी देतात़ यात विविध पूजा विधी, जप-जाप, पंचवीस प्रकारच्या विविध शांत्या, अस्थी विसर्जन आदी उपक्रम करण्यात येतात़ परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हे सर्व उपक्रम बंद आहेत़ यामुळे ब्रह्मवृंदावर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़
दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा हे धार्मिक स्थळ आहे. वर्षभर याठिकाणी येणाऱ्या भाविकांमुळे विविध उद्योग व्यवसाय तेजीत चालतात़ परंतु यंदा लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिकांचे हाल होत आहे़ त्यात ब्रह्मवृंदाचाही समावेश आहे़ सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे़ यादरम्यान विविध प्रकारचा पूजा विधी करण्यात येतात़ मात्र लॉकडाऊनमुळे हे सर्व बंद आहे़ चार महिन्यांपासून मंदिर आणि घाटावर शुकशुकाट आहे़ गेल्या चार महिन्यापासून सर्वत्र शांतता पसरली आहे .इतरवेळी याठिकाणी भाविक विविध पूजा विधी साठी येतात, खास करून अस्थी विसर्जनासाठी प्रकाशा पंचक्रोशीसह महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश येथून अस्थी विसर्जन साठी लोक येत होते़ केदारेश्वर तापी नदी घाट, संगमेश्वर मंदिर घाट या ठिकाणी अस्थी विसर्जन करण्यात येत होते़ लॉकडाऊनमुळे हा उपक्रम बंद पडला आहे़ मंदिर बंद असल्याने ब्रह्मवृंद नाही किंवा कोणताही धार्मिक विधी होताना दिसत नाही़
प्रकाशा येथे होणाºया धार्मिक विधींना महत्त्व आहे. दिवसभर मंदिर परिसरामध्ये विविध प्रकारचा पूजाविधी सुरू असतात दहा ते बारा दिवसभरातून पूजाविधी याठिकाणी ब्राह्मणांकडून होत असते, पूजा विधी करणारे भाविक हे नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणाहून येतात़ पूजा करणारे ब्रह्मवृंद हे प्रकाशा सह नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर ,विसरवाडी, बोरद, पिसावर, खरवड, दोंडाईचा, धुळे, सारंखेडा, जयनगर, निजर, वेलदा येथून ब्रह्मवृंद येतात.

प्रकाशा येथे उत्तर कार्यविधि, अस्थि विसर्जन, नारायण नागबळी, काल सर्प योग, २४ प्रकारच्या विविध शांती, जप-जाप, महामृत्युंजय, लघुरुद्र अभिषेक, पूजा विधी, याठिकाणी होते. केदारेश्वर मंदिर परिसरामध्ये या सर्व विधी सुरू असतात़ त्यांना येथील केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर, सद्गुरू धर्मशाळा, या ट्रस्टची नेहमी मदत होते़ काही विधी ह्या एका दिवसाच्या तर काही विधी तीन दिवसाची तर काही तीन ते पाच तासातच होतात.
 २२ मार्चपासून येथे कोणतीही पूजा विधी होत नाही़ त्यामुळे ब्रह्मवृंदावर सध्यातरी उपासमारीची वेळ आली आहे. या पूजा विधीतून ब्रह्मवृंदास ५०० ते ३ हजार रूपयांपर्यंत आर्थिक मदत होत होती़ लॉकडाऊनमुळे लघुरुद्र, अभिषेक, सत्यनारायण पूजा बंद असलने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आहे. दशामाता उत्सव, श्रावण मासात पुढे येणारे सण म्हणजे गौरी-गणपती, ऋषिपंचमी, नवरात्र असे मोठे सण आहे. ब्रह्मवृंद घरीच असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत़ शासनाने काही नियम शिथिल करून पूजा विधींना मान्यता द्यावी अशी मागणी आहे़

आषाढी एकादशी यात्रा पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर येथून काही भाविक प्रकाशा येथे येतात तेव्हा ते शिधा व सप्तधान्य ब्रह्मवृंदला दान करतात या येणाºया भक्तांची संख्या मोठी असते़ ते ब्राह्मणांना धान्य दान करत म्हणून त्याच्या तीन ते चार महिन्याच्या प्रश्न असाच सुटायचा मात्र सध्या तरी लॉकडाऊन आहे आषाढ महिना एकादशी अशीच गेली.
-दत्ता पाठक, प्रकाशा़

Web Title: Brahmavrind in crisis as religious rituals are closed in South Kashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.