ढेकवद येथे दोघांना बेदम मारहाण
By Admin | Updated: June 21, 2017 14:46 IST2017-06-21T14:46:51+5:302017-06-21T14:46:51+5:30
ढेकवद येथे चारा कापणा:या महिलेस धक्का दिल्याचा जाब विचारल्याचा राग येऊन दोघांना बेदम मारहाण करण्यात आली़

ढेकवद येथे दोघांना बेदम मारहाण
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.21 - तालुक्यातील ढेकवद येथे चारा कापणा:या महिलेस धक्का दिल्याचा जाब विचारल्याचा राग येऊन दोघांना बेदम मारहाण करण्यात आली़
ढेकवद शिवारातील एका शेतात सुनंदा करण वळवी ही महिला चारा कापत असताना परशुराम मोरे याने त्यांना धक्का दिला या जाब विचाररण्यासाठी अशोक स्वरूपसिंग वसावे हे गेले असता मोरे याने वसावे यांना व त्यांचा भाऊ सुनिल यास बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली़ मोरे याने अशोक वसावे यांच्या तोंडावर वीट मारून त्यांना दुखापत करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ याबाबत अशोक वसावे यांच्या फिर्यादीवरून मोरे याच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े