दोघांना डांबून खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:26 IST2020-07-10T12:26:40+5:302020-07-10T12:26:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रकाशा रस्त्यावर लांबोळा गावालगत ट्रक अडवून चालकाच्या खिशातून जबरीने पैसे काढून घेत चालक आणि ...

दोघांना डांबून खंडणीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : प्रकाशा रस्त्यावर लांबोळा गावालगत ट्रक अडवून चालकाच्या खिशातून जबरीने पैसे काढून घेत चालक आणि क्लिनर या दोघांना डांबून ठेवत अडीच लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना शहादा पोलीसांनी अटक केली आहे़ गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा गुन्हा घडला़
रामलाल किसनलाल आरोडा रा़ राजस्थान हा ट्रकचालक गुरूवारी पहाटे मध्यप्रदेशातील इंदौर येथून शहादा मार्गाने गुजरातकडे निघाला होता़ दरम्यान पहाटे अडीच वाजेच्या चौघांनी लांबोळा गावाजवळ ट्रकच्या समोर दुचाकी वाहन आडवे करुन चौघांनी ट्रकला थांबवले होते़ यावेळी चौघांनी चाकूचा धाक दाखवत ट्रकमध्ये प्रवेश करुन चालक रामलाल याच्या खिशातील पाच हजार रूपये काढून घेतले होते़ या प्रकारावर न थांबता चौघांनी चालक आणि क्लिनर या दोघांनाही ट्रकसह सोबत घेत शहादा शहरालगतच्या एका हॉटेलमध्ये डांबून ठेवत त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांची मागणी केली होती़ खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी देत चौघांनी मारहाण केली होती़ या प्रकाराची कुणकुण सकाळी पोलीसांना लागल्यानंतर त्यांनी शहादा शहरालगत असलेल्या त्या हॉटेलमध्ये धाव घेतली होती़ दरम्यान पोलीस आल्याचे पाहून एकाने पळ काढला तर तिघे पोलीसांच्या तावडीत सापडले़ ताब्यात घेण्यात आलेल्यांनी लल्लू शर्मा, विशाल पाटील, दीपक शर्मा आणि वैभव भावसार अशी स्वत:ची ओळख दिली आहे़ यातील लल्लू शर्मा हा फरार झाला आहे़
चौघांविरोधात दुपारी शहादा पोलीस ठाण्यात ट्रकचालकाच्या फिर्यादीवरुन दरोडा आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चौघांना गुरुवारी शहादा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
दुपारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी याठिकाणी भेट देत माहिती घेतली आहे़ घटनेची शहरात चर्चा सुरू असून चौघा संशयितांनी यापूर्वीही असा गुन्हा केला आहे किंवा कसे याचा तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे़ फरार झालेला लल्लू शर्मा याचा पोलीसांकडून शोध घेण्यात येत