व्हॅलेंटाईन डे ला २१५ जिवांनी घेतला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:30 IST2020-02-15T13:30:12+5:302020-02-15T13:30:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘व्हॅलेंटाईन डे’ ला सिव्हील, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सायंकाळी सहापर्यंत २१५ ...

Born on Valentine's Day with 3 lives | व्हॅलेंटाईन डे ला २१५ जिवांनी घेतला जन्म

व्हॅलेंटाईन डे ला २१५ जिवांनी घेतला जन्म

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘व्हॅलेंटाईन डे’ ला सिव्हील, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सायंकाळी सहापर्यंत २१५ बालकांचा जन्म झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ यात सामान्य रुग्णालयात १० माता प्रसूती झाल्या आहेत़
एखाद्या दिवसाची आठवण कायम राहावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो़ यात काहींना अनपेक्षित असे सुखद अनुभव येतात़ यातच जिल्ह्यात २१५ मातापित्यांसाठी १४ फेब्रुवारी हा दिवस खास ठरला आहे़ जिल्हा रुग्णालयासोबत ५८ पैकी निवडक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच ११ ग्रामीण रुग्णालयांसोबत तळोदा आणि नवापुर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये १४ फेब्रुवारी पहाटे ते सायंकाळपर्यंत वेळावेळी गर्भवती मातांची प्रसूती करण्यात आली़ यातील एकाही मातेची प्रसूती ही नैसर्गिक पद्धतीनेच करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातील एकाही पालकाने वेळेपूर्वी प्रसूतीचा निर्णय घेतलेला नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आला आहे़
दरम्यान जिल्ह्यात खाजगी नर्सिंग होममध्येही मातांची प्रसूती झाल्याची माहिती आहे़ परंतू सायंकाळपर्यंत त्या-त्या पालिका व ग्रामपंचायत क्षेत्रात नोंद पूर्ण झालेली नसल्याने माहिती उपलब्ध झालेली नाही़ विशेष म्हणजे खाजगी आणि सरकारी रुग्णालयात जन्मलेली सर्वच अर्भके सुखरुप असल्याची माहिती आहे़

Web Title: Born on Valentine's Day with 3 lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.