बोरदला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:29 IST2019-12-20T12:28:52+5:302019-12-20T12:29:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा पंचायत समिती व तळोदा तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त ...

Bordala taluka science demonstration | बोरदला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

बोरदला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा पंचायत समिती व तळोदा तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडर्न इंग्लिश स्कूल बोरद येथे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. यात ९२ उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी पिपल्स एज्युकेशन संस्थेचे चेअरमन लक्ष्मण माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वासंतीबाई ठाकरे, माजी समाज कल्याण सभापती नरहर ठाकरे, उपसरपंच रंजनकोरबाई राजपूत, संस्इथेचे संचालक व गणेश ग्रुपचे अध्यक्ष संजय माळी, अरविंद मगरे, विश्वनाथ कलाल, बच्चुसिंग परदेशी, मुरलीधर सागर, माजी प्राचार्य डी.व्ही. पाटील, गटशिक्षणाधिकारी एस.एम. धनगर, मंगेश पाटील, सीताराम ठाकरे उपस्थित होते.
या वेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष निमेश सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनात ३५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी धनगर यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेपासून लांब राहून विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. तसेच विज्ञान शिक्षकांनी विज्ञानाबाबत जनजागृती करुन अंधश्रद्धामुक्त भारत घडविण्याचे आव्हान केले. याप्रसंगी मॉडर्न इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नीलेश सूर्यवंशी यांनी शाश्वत कृषी पद्धत, स्वच्छता व आरोग्य संसाधन व्यवस्थापन उपकरणांबाबत माहिती दिली. प्रदर्शनात कल्याणी वळवी या विद्यार्थिनीने हैद्राबाद येथील घटना व महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर गीत सादर केल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या विद्यार्थिनीचे संस्थेचे चेअरमन लक्ष्मण माळी व मान्यवरांनी कौतुक केले. आभार मुख्याध्यापक नीलेश सूर्यवंशी यांनी मानले.
या प्रदर्शनासाठी तळोदा तालुका मुख्याध्यापक संघ व मॉडर्न इंग्लिश स्कूलचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Bordala taluka science demonstration