श्रमदानातील बंधारे तुडूंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:38 IST2019-07-28T12:38:50+5:302019-07-28T12:38:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसहभागातून केलेल्या कामात प्रचंड पाणीसाठा झाल्याने जयनगर, ता.शहादा येथील ग्रामस्थांच्या चेह:यावर आनंद फुलला असून, ...

श्रमदानातील बंधारे तुडूंब
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लोकसहभागातून केलेल्या कामात प्रचंड पाणीसाठा झाल्याने जयनगर, ता.शहादा येथील ग्रामस्थांच्या चेह:यावर आनंद फुलला असून, घामाचा दाम मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे.
जयनगर येथील ग्रामस्थांनी गाव व परिसर पाणीदार कसा होईल यासह शेतकरी आणि मजुरांचे जीवनमान कसे उंचावेल या दृष्टीकोनातून उभादगड शिवारात जलसंधारणाचे काम हाती घेतले. तसेच गावाजवळून जाणा:या चिकण्या नाल्यातही काम केले. या कामामुळे जवळपास 20 टक्के जलसाठा झाल्याने कोंढावळ, जयनगर, वडाळी, बोराडे, मातकुट, उभादगड, खापरखेडा आदी गावांना त्याचा फायदा होणार असून, शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, लोकसहभागातून करण्यात आलेले काम पाहून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गाव मुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला होता. गेल्या आठवडय़ात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका:यांनीही भेट देवून जलसंधारणाच्या कामाची पाहणी करीत ग्रामस्थांचे कौतुक केले. दरम्यान नरेगांतर्गत दगडपिचींगसाठी निधी देण्याचे आश्वासनही दिले. या कामामुळे सुमारे 2000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार असून, परिसरातील शेतकरी सुखी होईल. तसेच वरूण राजाची साथ लाभली तर ग्रामस्थांनी लोकसहभागातून केलेल्या कामाचे श्रमसाफल्य होईल एवढे मात्र नक्की.