उकाळापाणी जंगलात सट्टापिढी केली उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:12 IST2020-08-23T12:12:45+5:302020-08-23T12:12:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उकाळापाणी येथील संरक्षित वनक्षेत्रात अवैद्यरित्या सिमेंट पत्र्याचे शेड उभारून सुरू केलेली सट्टा पिढी जेसीबी ...

Boiling water destroys speculation in the forest | उकाळापाणी जंगलात सट्टापिढी केली उध्वस्त

उकाळापाणी जंगलात सट्टापिढी केली उध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उकाळापाणी येथील संरक्षित वनक्षेत्रात अवैद्यरित्या सिमेंट पत्र्याचे शेड उभारून सुरू केलेली सट्टा पिढी जेसीबी मशिनच्या साहाय्याने वनविभागाकडुन नष्ट करण्यात आली असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उकाळापाणी येथील वनरक्षक संतोष भिका गायकवाड, वडकळंबीचे वनपाल दिपक किसन जाधव, बारी येथील वनरक्षक दिपक दिलीप पाटील व बोरझरचे वनरक्षक संजय देवदास बडगुजर गस्त घालत असतांना खैर वृक्षाचे झाड तोडून रस्त्यावर आडवे पडलेले दिसुन आले. त्या ठिकाणी काही अनोळखी इसम तीन ते चार कटर मशीन च्या साह्याने वृक्षाची कटींग करत होते. एका वाहनाने वनविभागाचे शासकीय वाहन अडवुन त्या वाहनातील इसम वनविभागाच्या कर्मचार्यांच्या अंगावर धावून आला. शासकीय कामात अडथळा आणला. धक्काबुक्की केली. घटनास्थळी मोबाईल रेंज नसल्याने तात्काळ तेथुन निघून कर्मचारी आहवा फाट्याजवळ मोबाइल टॉवरच्या रेंजमध्ये आले. वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार तेथे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व चिंचपाडा वनक्षेत्राचे कर्मचारी दाखल झाले. संशयित त्या ठिकाणाहून साहित्यासह निघून गेले. अवैद्य वृक्षतोडीबाबत वनरक्षक संतोष गायकवाड व संजय बडगुजर यांनी संशयिताविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नवापुर पोलीस ठाण्यातही संशयिताविरोधात फिर्याद देण्यात आली आहे. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास उपवनसंरक्षक केवटे, सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, नवापुरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे व वनक्षेत्र कर्मचार्यांनी उकाळापाणी येथे भेट देउन राखीव वनक्षेत्रात अवैद्यरित्या सिमेंट पत्र्याचे शेड उभारून सुरू केलेली सट्टा पेढी जेसीबी मशिनच्या साहाय्याने नष्ट केली.


नंदुरबार

Web Title: Boiling water destroys speculation in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.