बोगस शिक्षक भरती प्रकरणी संस्थाचालकांच्या चौकशीमुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:48 IST2018-04-13T12:48:44+5:302018-04-13T12:48:44+5:30

बोगस शिक्षक भरती प्रकरणी संस्थाचालकांच्या चौकशीमुळे खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेत बोगस शिक्षक भरतीप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी धुळे, शहादा व जळगाव जिल्ह्यातील संबधित शिक्षण संस्था चालकांना पाचारण केले आहे. गुरुवारी एका संस्थाचालकाची चौकशी झाल्याचे समजते. यामुळे या प्रकरणातील दलालांमध्ये खळबळ उडाली आहे.
अपंग युनिटअंतर्गत बोगस शिक्षक भरतीप्रकरणी पोलिसांनी 31 शिक्षक आणि दोन अधिका:यांसह चार कर्मचारी अशा 37 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अपंग युनिट दाखविण्यात आलेल्या शाळांमध्ये चौकशी पुर्ण केली आहे. आता संबधित शिक्षणसंस्था चालकांची चौकशी सुरू केली आहे. तीन संस्थाचालकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यात धुळे, शहादा व जळगाव जिल्ह्यातील एका शिक्षण संस्था चालकाचा समावेश आहे. या शिक्षणसंस्था चालकाकडून चौकशीतून काय बाहेर पडते यावर चौकशीची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.
यामुळे बोगस शिक्षकांकडून पैसे घेवून दलाली करणा:या संबधितांमध्ये खळबळ उडाली आहे. आता पोलिसांचा त्यांच्यावर डोळा आहे. चौकशीअंती सर्व रोख संबधीत दलालांवर आहे. त्यामुळे त्यांची अटक अटळ मानली जात आहे. परिणामी संबधितांमध्ये खळबळ उडाली आहे. तपास फौजदार संदीप पाटील करीत आहे.