नागन प्रकल्पात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:48+5:302021-08-22T04:33:48+5:30
पोलीस सूत्रानुसार नवापूर तालुक्यातील भरडू धरणाच्या पाण्यात केळी पुनर्वसन गावाजवळ एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह शुक्रवारी ...

नागन प्रकल्पात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
पोलीस सूत्रानुसार नवापूर तालुक्यातील भरडू धरणाच्या पाण्यात केळी पुनर्वसन गावाजवळ एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह शुक्रवारी पाण्यात तरंगताना आढळून आला हा मृतदेह दोन ते तीन दिवस पाण्यात असल्याने कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत जागेवरच शवविच्छेदन केले. मृत व्यक्तीने पांढऱ्या रंगाचा बनियन, पॅन्ट, पायात चप्पल तसेच गळ्यात रुमाल बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.
याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात केळी पुनर्वसन येथील पोलीस पाटील जोला खेमा गावीत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अरुण कोकणी ते करीत आहेत. ओळख पटत असल्यास संबंधितांनी विसरवाडी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा, असे हवामान पोलिसांनी केले आहे.