पत्नी-पत्नीचे मृतदेह आढळले तापीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 11:21 IST2020-11-05T11:21:52+5:302020-11-05T11:21:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : पत्नीसह निघाला होता सासरीवाडीला, मात्र पोहचला प्रकाशाला आणि संपवली जीवनयात्रा... दोन दिवसांपासून शोध ...

पत्नी-पत्नीचे मृतदेह आढळले तापीत
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : पत्नीसह निघाला होता सासरीवाडीला, मात्र पोहचला प्रकाशाला आणि संपवली जीवनयात्रा... दोन दिवसांपासून शोध सुरू असलेल्या दाम्पत्यांचे मृतदेह प्रकाशा बॅरेजमध्ये आढळले. त्यांची दुचाकी मंगळवारी दुपारी तेथेच आढळून आली होती. एकलुता एक मुलाने केलेल्या आत्महत्येमुळे जुनमोहिदा येथील त्याच्या आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला.
पावबा लक्ष्मण ठाकरे (२४) व त्याची पत्नी सुश्याबाई पावबा ठाकरे (२०) रा.जुनमोहिदा, ता.नंदुरबार असे मयतांची नावे आहेत. पावबा हा आपल्या मोटरसायकलने (क्रमांक एम.एच.३९ए. एफ.०५५०) २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता आपल्या सारवाडी तलावडी , ता.शहादा येथे जाण्यासाठी निघाला होता. प्रकाशा मार्गे दोघे गावी जाण्यासाठी आले. परंतु सासरवाडीला न पोहचता दोघे बॅरेजच्या पाण्यात आढळले.
मंगळवारी त्यांची मोटरसायकल बॅरेजवर आढळली होती. मोटारसायकल मालकाचा तपास केला असता ती जुनमोहिदा येथील पावबा ठाकरे यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांना बोलविण्यात आले असता त्यांनी दोघे पती-पत्नी तलावडी येथे जाण्यासाठी निघाल्याचे सांगितले. त्यांचा आसपास शोध घेतला, पाण्यातही अंदाज घेतला, मात्र आढळून आले नव्हते. त्यामुळे नातेवाईक मंगळवारी सायंकाळी गावी परतले. दुसरीकडे प्रकाशा दूरक्षेत्राकडून देखील तपास सुरू होता. सकाळी मात्र त्या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आले. पोलिसांनी लागलीच लक्ष्मण ठाकरे यांना कळविले. त्यांनी पोलिस पाटील चेतन पाटील,ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील आणि गावातील नातेवाईक व इतरांसह प्रकाशा गाठले. मृतदेह पहाताच लक्ष्मण पाटील यांनी हंबरडा फोडला. मुलगा व सून असे अचानक सोडून जाऊच शकत नाही, असे ते सांगत होते.
त्यांच्या म्हणण्यानुसार सोमवार, २नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता ते आनंदाने तलावडी येथे जाण्यासाठी निघाले होते. घरात काहीही भांडणतंटा नव्हता. परिवार गुण्यागोविंदाने राहत होता. असे असतांना त्यांनी आत्महत्या करणे शक्यच नाही असेही नातेवाईकांकडून सांगितले जात होते. या घटनेमुळे जूनमोहिदा गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याला लहान बहिणी असून त्यांची लग्न झालेली नाहीत. दोघांवर प्रकाशा येथील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. पती-पत्नीचे मृतदेह शेजारीच ठेवण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी शोकाकूल वातावरण होते. यावेळी जूनमोहिदा, तलावडी येथील तसेच इतर ठिकाणचे नातेवाईक उपस्थित होते. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास माळी, सुनिल पाडवी, अरुण सैंदाणे, पंकज जिरेमाळी आदी करित आहेत.
शवविच्छेदन उशीराने...
प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करणारे एमबीबीएस डॉक्टर नसल्याने वाडी पुनर्वसन येथून डॉक्टरांना बोलवावे लागले. दुपारी १२ वाजता डॅाक्टर आले, परंतु सहकार्य करण्यासाठी कर्मचारी नव्हता. तो देखील दुपारी अडीच वाजता पोहोचला. शवविच्छेदन प्रक्रिया करण्यासाठी मग सायंकाळचे साडेचार पाच वाजले होते. त्यामुळे लोकाचा संताप अनावर झाला होता.
डॅाक्टरांची नेमणूक व्हावी
प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर ची अत्यावश्यक गरज आहे. या ठिकाणी वेळोवेळी शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध होत नाही तेव्हा बाहेरगावी डॉक्टर बोलवावा लागतो. तसेच शवविच्छेदन करण्यासाठी स्वीपर ची ही अतिशय गरजेचे आहे.तेव्हा उड कडे ही तक्रार कली आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन ताबडतोब येथील पदे भरले पाहिजेत. अशी मागणी केली आहे.
-रामचंद्र पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष.