पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा खून
By Admin | Updated: June 30, 2017 14:08 IST2017-06-30T14:08:05+5:302017-06-30T14:08:05+5:30
शहादा तालुक्यातील मडकाणी येथील घटना

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा खून
>ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.30- शहादा तालुक्यातील मडकाणी येथे हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या महिलेचा धुळे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला़
मडकाणी येथील यमाबाई ऊखा वळवी या सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गावातील कालुसिंग नारसिंग पाडवी यांच्या घरासमोरील रस्त्यावर असलेल्या सरकारी हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या़ या ठिकाणी पाणी भरत असताना, त्यांना मोग्या धडा चौधरी रा़ मडकानी याने विरोध केला़ यमाबाई यांनी त्याला तसा जाब विचारला असता, मोग्या चौधरी याने हातातील लाकडाने त्यांना बेदम मारहाण केली़ रात्रीची वेळ असल्याने त्यांच्या कुटूंबियांना याबाबतची माहिती उशिरा मिळाली़ यात मोग्या याने डोक्यावर डेंगा:याने वार केल्याने यमाबाई गंभीर जखमी झाल्या होत्या़ गंभीर जखमी यमाबाई यांना प्रथम म्हसावद ग्रामीण रूग्णालयात आणि तेथून तात्काळ धुळे येथे उपचारांसाठी नेण्यात आल़े त्याठिकाणी उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला़ यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी म्हसावद पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला़
मयत यमाबाई यांचा मुलगा संतोष वळवी याने म्हसावद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोग्या चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़