अतिक्रमित वनजमिनीच्या वादातून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:12 IST2019-06-12T12:12:47+5:302019-06-12T12:12:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील बोरद येथे अतिक्रमीत वनजमिनीच्या वादातून शालकाने इतर नातेवाईकांसह मेहुण्याला बेदम मारहाण करून जीवे ...

अतिक्रमित वनजमिनीच्या वादातून खून
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील बोरद येथे अतिक्रमीत वनजमिनीच्या वादातून शालकाने इतर नातेवाईकांसह मेहुण्याला बेदम मारहाण करून जीवे ठार मारल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजता घडली.
पोलीस सूत्रानुसार, मयत रुपसिंग रतिलाल नाईक (62) मुळ रा.तुळाजे ह.मु. बोरद, ता.तळोदा याची तुळाजे येथील अतिक्रमित वनजमीन शालक देवा लालसिंग मोरे, करण देवा मोरे हे करीत असून, या अतिक्रमित वनजमिनीच्या कारणावरून शालक व मेहुणा यांच्यात वाद झाला. मयत रूपसिंग नाईक हा त्याचा भाचा कांतीलाल रमेश भिल याच्याकडे बोरद येथे गेल्या सात ते आठ वर्षापासून राहात आहे.
11 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तुळाजे येथून संबंधीत देवा लालसिंग मोरे त्याची पत्नी वशीबाई मोरे, करण देवा मोरे, मयताची पत्नी आसुबाई, तिची बहिण उषाबाई दिलीप ठाकरे, मुलगी जमनाबाई व तीचा पती पिंटय़ा लालसिंग मोरे यासह इतर ओळखीचे तीन ते चार स्त्री-पुरूष देवा मोरे यांच्या गाडीतून लाठय़ा-काठय़ा व लोखंडी सळ्या घेऊन बोरद येथे कांतीलाल रमेश भिल यांच्या घरी आले. त्याचा मामा रूपसिंग रतिलाल नाईक (62) हा बाहेर खाटेवर बसला होता. या सर्वाना बघन तो घरात पळाला. ते सर्व जण त्याच्या मागोमाग घरात पळाले. त्यांनी लोखंडी सळ्या, लाठय़ा काठय़ांनी रूपसिंग नाईक यास बेदम मारहाण केली. यानंतर त्यास घरातून बाजारात नेत तेथेही बेदम मारहाण केली. या वेळी बाजारात गर्दी जमली. कातीलाल भिल त्याची पत्नी व इतरांनी सोडविण्याचा प्रय} केला परंतु मारणारे अधिक असल्याने ते कोणाचेच ऐकत नव्हते.
जखमी अवस्थेत फिर्यादी मयताचा भाचा कांतीलाल रमेश भिल याने मयतास उपचारासाठी तेथील दवाखान्यात दाखल केले. मात्र तपासणी नंतर रूपसिंग नाईक मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कांतीलाल भिल यांच्या फिर्यादीवरून संशीयांविरूद्ध उशिरार्पयत गुन्हा दाखल करण्यात येत होता. तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.