‘लोकमत’तर्फे जिल्ह्यात २ जुलैपासून रक्तदान शिबिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST2021-06-29T04:21:07+5:302021-06-29T04:21:07+5:30
लोकमत व व्हीएसजीएमतर्फे ग्रामीण भागात शिबिरे दरम्यान, लोकमत व विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळातर्फे ग्रामीण ...

‘लोकमत’तर्फे जिल्ह्यात २ जुलैपासून रक्तदान शिबिरे
लोकमत व व्हीएसजीएमतर्फे ग्रामीण भागात शिबिरे
दरम्यान, लोकमत व विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळातर्फे ग्रामीण भागात १८ ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात येणार असून, त्याच्या नियोजनासंदर्भात सोमवारी बैठक झाली. यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी शीतलभाई ऊर्फ मुन्नाभाई पटेल, संदीप पाटील (शहादा), चंद्रकांत पाटील (हिंगणी), प्रवीण पाटील (सुजालपूर), हितेशभाई पटेल (चिचोदा), तसेच नवजीवन रक्त संस्थेचे संचालक डॉ. सुनील पटेल हे उपस्थित होते. यावेळी शिबिरांचे नियोजन करून ते यशस्वी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानुसार २ जुलैला बामखेडा, ता. शहादा, ३ जुलै वडाळी, ता .शहादा, ४ जुलै म्हसावद, ता. शहादा, ५ जुलै गुजरखर्दे, ६ जुलै जयनगर, ७ जुलै फेस, ८ जुलै लोणखेडा, ता. शहादा, ९ जुलै मोड, ता. तळोदा, १० जुलै सरवाळा, ११ जुलै सुजालपूर, ता. नंदुरबार, १२ जुलै पिंप्री, ता. शहादा, १३ जुलै मनरद, ता. शहादा, १४ जुलै सारंगखेडा, १५ जुलै शेल्टी, १६ जुलै तळोदा, १७ जुलै मुबारकपूर, १८ जुलै हिंगणी, ता. शहादा, तसेच १८ जुलै नवापूर असे नियोजन करण्यात आले आहे.
यांनी करावे रक्तदान
१८ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती
कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते
लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते