जिल्हा प्रशासनातर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:14 IST2020-12-18T11:14:36+5:302020-12-18T11:14:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस मुख्यालयातील गंधर्व हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात दुपारपर्यंत ...

Blood donation camp by district administration | जिल्हा प्रशासनातर्फे रक्तदान शिबिर

जिल्हा प्रशासनातर्फे रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस मुख्यालयातील गंधर्व हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात दुपारपर्यंत १२६ व्यक्तींनी रक्तदान केले.  शिबिराचे उद्‌घाटन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे आदी उपस्थित होते.
          या प्रसंगी गमे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना इतर शस्रक्रियांसाठी आवश्यक रक्ताचा तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. अशावेळी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या रक्तदान शिबिरामुळे रुग्णांना आवश्यक रक्त उपलब्ध करून देणे शक्य होईल. या शिबिरात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ.भारुड म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
           या वेळी डॉ.भारुड यांनी स्वत: सकाळी रक्तदान केले. शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गमे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. उप‍जिल्हाधिकारी सुधीर खांदे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांनीही शिबिर यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

 

Web Title: Blood donation camp by district administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.