सरवाळा येथे ५१ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:20+5:302021-07-11T04:21:20+5:30

सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन ...

Blood donation of 51 donors at Sarwala | सरवाळा येथे ५१ दात्यांचे रक्तदान

सरवाळा येथे ५१ दात्यांचे रक्तदान

सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व विविध शहर ग्राम गुजर पाटीदार ग्लोबल मित्रमंडळ ( व्हीएसजीजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सरवाळा (ता. निझर) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन निझर तालुका प्रांताधिकारी मेहुल देसाई, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निझर शाखेचे शाखाधिकारी शैलेश पटेल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महिला, पुरुष, तरुण मित्रमंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात एकूण ५१ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. रक्तदान शिबिरात पहिल्यांदा १९ व्यावर्षी चंचल हरिष पटेल या युवतीने रक्तदान केले.

शिबिरासाठी सरवाळा येथील नवयुवक मित्रमंडळाचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक मंडळ, सरपंच योगेश ठाकरे, वि. का. सहकारी मंडळाचे चेअरमन महेंद्र पटेल, भाजप किसान मोर्चाप्रमुख महेंद्र उद्धव पटेल, कमलेश पटेल, हरिष पटेल, पृथ्वीराज पटेल, स्वप्नील पटेल, मुकेश पटेल, जयेश पटेल, विशाल पटेल, प्रशांत पटेल, विकास पटेल, जयेश तुकाराम पटेल, रोशन पटेल, ध्रुव पटेल, वीराज पटेल, युगेन पटेल, सनी पटेल, व्हीएसजीजीएमचे सदस्य भावेश पटेल, चिंचोदा येथील हितेश पटेल, अनिल पटेल, सुनील पटेल, सतीश पटेल, मयूर पटेल, हर्षल पटेल, आशिष पटेल, निखिल पटेल, यतीश पटेल, हेमंत न्हावी, योगेश पटेल, हिरालाल पटेल, उपेंद्र पटेल, दिलीप पटेल, नरेश पटेल, ईश्वर पटेल, शैलेश पटेल, संजय पटेल, शांतिलाल पटेल, कैलास पटेल, नंदुरबार येथील अभिनव विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रल्हाद पाटील, माजी नगरसेवक रमेश पटेल आदी उपस्थित होते. धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे संचालक डॉ. सुनील चौधरी, रोहिदास जाधव, गजानन चौधरी, उद्धव पाटील, कैलास पटेल, चंद्रकांत दंडगव्हाळ, पांडुरंग गवळी यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Blood donation of 51 donors at Sarwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.