पिंप्री येथे ३६ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST2021-07-17T04:24:35+5:302021-07-17T04:24:35+5:30

पिंप्री येथील श्री हनुमान मंदिर सभागृहात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, ...

Blood donation of 36 donors at Pimpri | पिंप्री येथे ३६ दात्यांचे रक्तदान

पिंप्री येथे ३६ दात्यांचे रक्तदान

पिंप्री येथील श्री हनुमान मंदिर सभागृहात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, कैलास पाटील, श्रीपत पाटील, कैलास ब्रिजलाल पाटील, विकास पाटील, नरेंद्र पाटील, ईश्वर पाटील, माधव पाटील, संजय पाटील, विलास पाटील, शरद पाटील, भगवान पाटील, गणेश पाटील यांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सिद्धीविनायक गणेश मित्र मंडळाचे सदस्य, सागर पाटील, हितेश पाटील, मयूर पाटील, ऋषीकेश पाटील, खगेंद्र पाटील, गौरव पाटील, आकाश पाटील, सचिन पाटील, अजय पाटील, महेश पाटील, धनंजय पाटील, सनी पाटील, सतीश पाटील, जयेश पाटील, हर्षल पाटील, श्रेयस पाटील, परीक्षित पाटील, हर्षल चौधरी, कुणाल पाटील, अक्षय पाटील, दीप राज पाटील, घनश्याम पाटील, मुकेश पाटील, रत्नदीप पाटील, स्वप्नील पाटील, राहुल पाटील तसेच औरंगपूर, म्हसावद, डामरखेडा, बामखेडा, शहादा, सेल्वासा लेवा पाटीदार समाज मंडळाचे सदस्य विनय पाटील व व्हीएसजीजीएमचे सदस्य उपस्थित होते.

शिबिरात किशोर जयदेव पाटील व सविता किशोर पाटील या दाम्पत्यासह एकाच कुटुंबातील कैलास ब्रिजलाल पाटील, सागर पाटील व आकाश पाटील यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी पिंप्री येथील व्हीएसजीजीएमचे सदस्य, ग्रामस्थ, सिद्धीविनायक गणेश मित्र मित्र मंडळाचे सदस्य यांचे सहकार्य लाभले. धुळे येथील नवजीवन रक्तसंकलन पेढीचे संचालक डॉ.सुनील चौधरी, चंद्रकांत दंडगव्हाळ, पांडुरंग गवळी, अमोल सोनवणे, मयुरी देशमुख, शीतल वाडिले यांनी रक्तसंकलन केले.

Web Title: Blood donation of 36 donors at Pimpri