मनरद येथे ३५ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:41+5:302021-07-14T04:35:41+5:30

सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन ...

Blood donation of 35 donors at Manrad | मनरद येथे ३५ दात्यांचे रक्तदान

मनरद येथे ३५ दात्यांचे रक्तदान

सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व विविध शहर ग्राम गुजर पाटीदार ग्लोबल मित्रमंडळ (व्हीएसजीजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने मनरद येथे झालेल्या रक्तदान शिबिरात ३५ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे हरी पाटील, नगीन पाटील, जगन्नाथ पाटील, गोपाळ पाटील, पुरुषोत्तम पाटील, पोलीस पाटील नीलेश वसंत पाटील, ॲड.दीपक पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

शिबिरात वैद्यकीय व्यवसायात कार्यरत डॉ.विजय हरी पाटील व कविता विजय पाटील या दाम्पत्याने रक्तदान केले. २ जुलै ते १३ जुलै या आठवडाभरात ७८९ पेक्षा अधिक रक्तपिशव्या संकलन करण्यात आल्या. यावेळी इंदूर लेवा पाटीदार मंडळाचे पदाधिकारी रविकांत पाटील, सेल्वासा पाटीदार मंडळाचे विनय पाटील यांनीही सहभाग नोंदविला. शिबिरासाठी गावातील युवक व ग्रामस्थांनी सहकार्य केले. पायल विश्राम पाटील व दामिनी विलास पाटील या युवतींनी ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही रांगोळी रेखाटून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे संचालक डॉ.सुनील चौधरी, रोहिदास जाधव, गजानन चौधरी, उद्धव पाटील, कैलास पटेल, चंद्रकांत दंडगव्हाळ, पांडुरंग गवळी यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Blood donation of 35 donors at Manrad