तळोद्यात 286 दात्यांकडून रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:59 IST2019-07-29T12:58:26+5:302019-07-29T12:59:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा/कोठार : शहरातील श्री संत सावता माळी युवा मंचतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 286 दात्यांनी रक्तदान ...

तळोद्यात 286 दात्यांकडून रक्तदान
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा/कोठार : शहरातील श्री संत सावता माळी युवा मंचतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 286 दात्यांनी रक्तदान केले. शिबिरात सैनिकांना आर्थिक मदतीसाठी ‘भारतीय सैन्य निधी’ अंतर्गत ठेवण्यात आलेल्या दानपेटीत सहा हजार 600 रुपये जमा झाले. ही रक्कम जिल्हाधिका:यांकडे सैनिक निधी म्हणून सुपूर्द करण्यात येणार आहे.
श्री संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत तळोदा येथील श्री संत सावता माळी युवा मंचतर्फे मोठा माळीवाडय़ातील श्री संत सावता भवन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबीरात पती-प}ी, दिव्यांग रुपेश अविनाश सूर्यवंशी व 40 महिलांसह 286 दात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी मोठ्ठी गल्ली, काकाशेठ गल्ली व खान्देशी गल्लीतील माळी समाजाच्या नागरिकांनी विशेषत: युवकांसह माळी समाज पंच मंडळ, माळी समाज महिला मंडळ व नवजीवन रक्तपेढीचे डॉ.सुनील चौधरी, डॉ. प्रशांत पाटील, रक्तपेढी तंत्रज्ञ रोहिदास जाधव, चंद्रकांत दंडगव्हाळ, सुभाष खैरनार, मयुरी देशमुख, सुरेश राजपूत, जुनीत खाटीक, उमेश सोनार, अरुण सुतार आदींनी परिश्रम घेतले. रक्तदात्यांना ब्लड बँकेकडून प्रशस्तीपत्र देण्यात आले.
तळोदा येथील श्री संत सावता माळी युवा मंचाकडून सन 2015 पासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या वर्षी 223, दुस:या वर्षी 294, तिस:या वर्षी 336, चौथ्यावर्षी 303 तर यंदाच्या शिबिरात 286 दात्यांनी रक्तदान केले. पाच वर्षात तब्बल एक हजार 442 दात्यांनी या शिबिरांच्या माध्यमातून रक्तदान केले आहे. त्यामुळे या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.