नंदुरबार येथील शिबिरात १४५ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:10+5:302021-02-09T04:34:10+5:30
प. पू. सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन व संत निरंकारी मंडळ यांच्यामार्फत ...

नंदुरबार येथील शिबिरात १४५ दात्यांचे रक्तदान
प. पू. सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन व संत निरंकारी मंडळ यांच्यामार्फत येथील सिंधी कॉलनी परिसरातील श्रीराम कॉलनीत संत निरंकारी सत्संग भवन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात १४५ दात्यांनी रक्तदान केले. १६ महिला तर १२९ पुरुषांचा समावेश होता. शिबिराचे उद्घाटन धुळे विभागाचे निरंकारी मंडळाचे प्रमुख हिरालाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमास शत्रुघ्न बालाणी, जगदीश ओझरकर, मोहन अहुजा, पी. डी. निकुंभे, सुनील बागुल, कुणाल कानड, शंकरलाल हासाणी यांच्यासह भाविक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
संत निरंकारी मंडळातर्फे देशभरातील सर्व शाखांमध्ये सुमारे १० लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान केले. अध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक कार्य मंडळामार्फत सुरू असते. त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.